10 वर्ष 11 महिने 9 दिवसांच्या बालिकेवर वकीलाने केला 14 महिने अत्याचार

नांदेड(प्रतिनिधी)- 10 वर्ष 11 महिने 9 दिवसांच्या अल्पवयीन बालिकेच्या आजीचा प्रियकर असलेल्या एका वकीलाने जवळपास ऑगस्ट 2023 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत सलग 14 महिने त्या अल्पवयीन बालिकेवर अन्याय केला. या अन्यायात बालिकेची आजी आरोपी वकीलाला सक्रीय मदत करत होती.
गंगाखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून गंगाखेड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने 2 तासात आरोपींना जेरबंद केले आहे.
        पोलीस ठाणे गंगाखेडच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची 10 वर्ष 11 महिने 9 दिवसांची अल्पवयीन बालिका आहे. तिच्यासोबत ऍड.राम गायकवाड या व्यक्तीने अल्पवयीन बालिकेची आजी जी त्या वकीलाची प्रेमीका आहे.तिच्या मदतीने त्या अल्पवयीन बालिकेवर सलग 14 महिने अत्याचार केला. अत्याचार करतांना वकीलाची 50 वर्षीय प्रेमीका त्या बालिकेला पकडून ठेवत असे. जेणे करून अत्याचार पुर्णपणे व्हावा. एफआयआरमध्ये या पेक्षा भयंकर बाबी लिहिलेल्या आहेत. त्या लिहुन आम्ही आमच्या लेखणीला डाग लावून घेवू इच्छीत नाही. वकील असतांना म्हणजे कायदा माहित आहे. तरी सुध्दा त्याने हे कृत्य केले. आता दाद कोणाकडे मागावी आणि अशा प्रकरणांमधून समाजाला काय दिशा मिळेल. वैद्यकीय अहवालात त्या बालिके बद्दल लिहिलेले शब्द सुध्दा अत्यंत घातक आहेत.
तक्रार आल्यानंतर गंगाखेडचे पोलीस निरिक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या आदेशानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक सिंगनवाड यांनी हा गुन्हा 709/2024 नुसार दाखल केला. यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 109, 114, 354(अ), 376, 376(2)(एन), 376(अ), 376(ब), 506, 34 सोबत पोक्सो कायद्याचे कलम 10, 17, 4, 6 आणि 8 जोडण्यात आले आहे. या अल्पवयीन बालिकेला वकील राम गायकवाड अश्लील चित्रपट दाखवायचा आणि तिच्यावर आपल्या प्रेमीकेच्या मदतीने अत्याचार करायचा.
गंगाखेड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक शेख असद, बुधोडकर, पोलीस अंमलदार परसराम परचेवाड, राहुल राठोड, श्रीमती जिंकलवाड आदींनी बालिकेवर अत्याचार करणारा वकील आणि त्याला मदत करणारी त्याची 50 वर्षीय प्रेमीका या दोघांना 2 तासातच जेरबंद केले आहे. हा गुन्हा आज सकाळी दाखल झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक राम गिते यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!