नांदेड(प्रतिनिधी)-सध्या विधानसभा निवडणुक प्रक्रियेमध्ये किनवट विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराने विष प्राशन केले आहे. कोणी या घटनेला वेगळे स्वरुप देण्याचा प्रयत्न करतील परंतू उमेदवारांने 48 लाख रुपये उधारी असल्याने हे विष प्राशन केल्याचा अर्ज त्यांच्या नातलगांनी दिला आहे. सध्या विष प्राशन केलेल्या उमेदवाराला पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविले आहे.
सध्या काळात राज्यात विधानसभा निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये किनवट विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार गोविंद जेठेवाड(55) वर्ष रा.गोकुंदा किनवट यांनी विष प्राशन केल्याची माहिती प्राप्त झाली. याबाबीची सत्यता जाणून घेतली तेंव्हा गोविंद जेठेवाड हे किनवट येथील जन्नावार यांचे 48 लाख रुपये देणे आहेत. त्या संदर्भाने आज बैठक सुध्दा झाली होती आणि त्या बैठकीनंतर गोविंद जेठेवाड यांनी काही तरी विष प्राशन केले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे. जन्नावारचे गोविंद जेठेवाड यांनी 48 लाख रुपये देणे आहे असा अर्ज गोविंद जेठेवाडच्या कुटूंबियांना किनवट पोलीसांकडे दिला असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी सांगितली आहे.