नांदेड लोकसभेसाठी 19 उमेदवार; 9 विधानसभा मतदार संघामध्ये 165 उमेदवार

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीत आता 19 उमेदवार शिल्लक राहिले आहेत आणि 9 विधानसभेमध्ये एकूण 165 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत अशी माहिती जिल्हा निवडणुक अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
16 नांदेड लोकसभा पोट निवडणुकीमध्ये एकूण 39 जणांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते. त्यात आज उमेदवारी परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 20 लोकांनी उमेदवारी अर्ज परत घेतले आहेत. लोकसभा पोट निवडणुक लढविणाऱ्यांची संख्या आता 19 आहे.
नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदार संघामध्ये 83-किनवट येथे 29 अर्ज वैध ठरले होते. त्यातील 12 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले आहेत. आता 17 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. 84-हदगाव येथे 63 अर्ज वैध ठरले होते. त्यातील 39 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले आहेत. आता 24 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.85-भोकर येथे 140 अर्ज वैध ठरले होते. त्यातील 115 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले आहेत. आता 25 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. 86-नांदेड उत्तर येथे 72 अर्ज वैध ठरले होते. त्यातील 39 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले आहेत. आता 33 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. 87-नांदेड दक्षीण येथे 51 अर्ज वैध ठरले होते. त्यातील 31 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले आहेत. आता 20 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. 88-लोहा येथे 33 अर्ज वैध ठरले होते. त्यातील 19 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले आहेत. आता 14 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. 89-नायगाव येथे 26अर्ज वैध ठरले होते. त्यातील 16 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले आहेत. आता 10 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. 90-देगलूर येथे 27 अर्ज वैध ठरले होते. त्यातील 16 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले आहेत. आता 11 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. 91-मुखेड येथे 17 अर्ज वैध ठरले होते. त्यातील 6 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले आहेत. आता 11 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. नऊ विधानसभा मतदार संघांमध्ये एकूण 458 नागरीकांनी उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यातील 293 जणांनी माघार घेतली आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात 9 विधानसभामध्ये 165 उमेदवार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!