देशभरात 463 जणांना मिळालेला हा सन्मान ; महाराष्ट्रातील जवळपास 25 जणांचा समावेश
नांदेड(प्रतिनिधी)-देशाच्या गौरवासाठी, देशाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या देशभरातील अनेक सुरक्षा पथकांमध्ये कार्यरत 463 जणांना “केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’-2024 प्रदान करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 25 जणांचा समावेश आहे. त्या 25 जणांमध्ये नांदेड जिल्ह्याच्या एटीएस पथकामध्ये कार्यरत रमाकांत पांचाळ यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे.
दि.31 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार देशभरात विविध सुरक्षा पथकांमध्ये काम करणाऱ्या 463 जणांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर करण्यात आले. त्यात देशातील जिल्हा पोलीस, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस, केंद्रीय सुरक्षा पथक, एनसीबी, सीबीआय, एनआयए मध्ये कार्यरत पोलीस अधिक्षक ते पोलीस अंमलदार यांना ही 463 पदके देण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील जवळपास 25 जणांचे नाव या यादीत आहे. महाराष्ट्र राज्याच्या वैध वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या संचालिका डॉ.संगिता विजय घुमटकर,पोलीस अधिक्षक जयंत मिणा,ज्योत्सना रासम, विक्रम देशमाने,सुशिल शर्मा,ृ पोलीस उपअधिक्षक ऋषीकेश प्रदीप रावले, पोलीस निरिक्षक ,अजय खाशाबा सावंत, रमाकांत धोंडीबा पांचाळ, शंकर विठ्ठल शेळके, समिर प्रकाश लोणकर, सिध्देश त्र्यंबक लांबडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक जगदीश दिनकर सेल, स्वप्नील शिवाजी चव्हाण, चंद्रकांत संतराम लोहकरे, रविंद्र यशवंत गवारी, पंकज विनय चके्रे, मनोज श्रीराम चौधरी, विवेकानंद बलभिम पाटील, उमेश शामराव बोरसे, रेखा सागर शंकपाळ, सिध्दार्थ दिलीप जोशटे, पोलीस उपनिरिक्षक राधिका गिरधर बावसार या महाराष्ट्रीयन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 463 पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये नाव आहे.
केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक देतांना त्या-त्या विभागाच्या अधिकारी आणि अंमलदारांनी राबविलेल्या विशेष मोहिमांसाठी हे पदक दिले गेले आहे. त्यांनी राबविलेल्या मोहिमांमध्ये देशाची सुरक्षा आणि देशाचा गौरव समाविष्ट आहे. नांदेडमधील एटीएस पथकाचे पोलीस निरिक्षक रमाकांत पांचाळ यांनी 9 डिसेंबर 2023 रोजी राबविलेल्या विशेष मोहिमेत त्यांना मिळालेले यश त्यांच्या देश सेवेसाठी महत्वपूर्ण आहे.
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे,सुरज गुरव, सहाय्यक पोलिस अधीक्षक शफाकत आमना, कृतिका, उप अधीक्षक डॉ.अश्विनी जगताप,सुशील कुमार नायक आदींनी रमाकांत पांचाळ यांचे अभिनंदन केले आहे.
वाचकांच्या सोयीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेली 463 जणांच्या नावाची पिडीएफ संचिका बातमीसोबत जोडली आहे.
Awards_31102024 Central Govt India