महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक काही नेत्यांना शुन्याकडे नेणारी आहे. तर काही जणांसाठी हा अस्तित्व टिकविण्याचा प्रश्न आहे. या परिस्थितीत मतदारांनी खऱ्या माणसाला मतदान करणे आवश्यक आहे. तरच ही लोकशाही टिकून राहिल. सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राची निवडणुक जिंकणे सुध्दा महत्वपुर्ण आहे. नसता केंद्रात मोठे बदल होणार आहेत. काय पाहिजे मतदारांना हे मतदारांनी स्वत: ठरवायला हवे.
महाराष्ट्र विधानसभा सभा-2024 ची निवडणुक जाहीर झाली आहे. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. काही मतदार संघांचे उमेदवार अद्याप निश्चित होणे आहेत. यात सर्वात मोठी खेळी भारतीय जनता पार्टी सुध्दा करत आहे. भारतीय जनता पार्टीने आपले काही उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातून उमेदवार तयार केले आहेत. कारण ईडी, सीबीआय आणि आयकर या भितीमुळे मागच्या काही काळात भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आणि त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांची संख्या सुध्दा वाढली. हा तिढा सोडविण्यासाठी भाजपने आपलेच काही कार्यकर्ते अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी झाली आहे. कारण अजित पवार गटाकडे जेवढ्या जागा मिळाल्या तेवढे उमेदवार सुध्दा नाहीत काय? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला. पण भारतीय जनता पार्टीची ही खेळी लांबची आहे. कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट बहुमताकडे आला नाही तर अजित पवार यांच्या पक्ष शुन्य होणार आहे. तसेच त्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार निवडुण येतील ते उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच आहेत असा डबल गेम भारतीय जनता पार्टी खेळत आहे. या गेममधून जनतेने काय घ्यावे त्याबद्दल नक्कीच आम्हाला म्हणायचे आहे की, जनतेने तुम्हाला जो राज्य नेता आवडतो, तुमच्या समोर असलेल्या उमेदवारांपैकी जो उमेदवार तुम्हाला आवडतो त्या माणसाला निवडूण द्या. मागील तिन-चार निवडणुकांपासून निवडणुकीच्या दरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या खेळांना यावेळेस थांबवा. कोणत्याही खेळात अडकू नका. कारण तुमच्या या मतदानाने राज्याचे, राज्यातील काही काही राजकीय पक्षाचे, काही राजकीय नेत्यांचे पुढील मार्ग ठरणार आहेत. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जो येईल त्यावर केंद्र सरकारचे भवितव्य सुध्दा अवलंबून आहे. मतदारांनी बदल हा जीवनाचा आवश्यक भाग आहे. या वाक्याला अनुलक्षून या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करायला हवे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उध्दव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, आणि शरद पवार या सर्व नेत्यांच्या अस्तित्व टिकविण्याचा प्रकार घडणार आहे. यामध्ये आजच्या परिस्थितीत हिंदु या दैनिकाने प्रकाशित केलेल्या सर्व्हे प्रमाणे सर्वाधिक जनता उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पाहु इच्छीते. झालेला सर्व्हे हा प्रामाणिक असेल तर ही बाब चांगली आहे. उध्दव ठाकरे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात दीड वर्ष कोरोना काळ पाहिला. यावेळेस सुध्दा त्यांनी भरपूर कामे केली आहेत. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मिळालेला आहे. आजच्या परिस्थितीत त्यांच्याकडे महाराष्ट्रात असणाऱ्या विविध जाती धर्मातील अनेक वर्गांचा पाठींबा आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री झाले तर काही हरकत नाही.
या निवडणुकीत अजित पवार यांना सुध्दा त्यांना मिळणाऱ्या मतदानानंतर शुन्याकडे वाटचाल करावी लागेल याची शक्यता सर्वाधिक आहे. कारण शरद पवारांच्या तालिमीत राजकारण शिकलेल्या अजित पवारांनी एका चौकशीच्या भितीमुळे भाजपची संधान साधले आणि सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद मिळविले. अजित पवार हे कसे विसले की, शरद पवारांनी इंदिरा गांधी या जगातील धुरंधर देत्या भारताच्या पंतप्रधान असतांना त्यांच्या सोबत पंगा घेवून पुलोदची स्थापना केली होती आणि 38 व्या वर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. आजच्या परिस्थितीत या दोघांमध्ये या जनतेची बाजू ही शरद पवारांच्यावतीने जास्त प्रभावी दिसते. द हिंदुने केलेल्या सर्व्हेमध्ये सर्वात कमी लोक अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची पसंती देतात.
एकनाथ शिंदे यांचा वापर करून ठाकरेची शिवसेना फोडणे, त्यांचे पक्ष चिन्ह बळकावणे तसेच अजित पवारांना फोडून राष्ट्रवादी पक्षच नव्हे तर घरफोडणे, त्यांचेही पक्ष चिन्ह बळकावणे या कामात भाजपला यश आले. पण महाराष्ट्राच्या जनतेला भाजपने केलेली ही कामे आवडलेली नाहीत. पंगा असो शकतो पण तो कुठपर्यंत न्यायचा हे ठरवायला हवे. शरद पवारांच्यासोबत काही वर्षांपुर्वी एका नेत्याचा वाद झाला आणि त्यानंतर एका बैठकीमध्ये शरद पवार यांच्याकडची मंडळी त्या नेत्याच्या मुलाबद्दल बोलत असतांना शरद पवारांनी स्पष्ट सांगितले होते की, मुलगा आणि कुटूंबातील इतर व्यक्तींबद्दल काही ब्र शब्द बोलायचा नाही. या अशा व्यक्तीच्या सबंधाने भारतीय जनता पार्टीने केलेले अनेक घाणेरडे वक्तव्य जनतेला पसंत नाहीत.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एका सभेत शरद पवार म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांचा नेता आहे असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे उत्तर देतांना शरद पवारांनी सुध्दा एक तडीपार मला प्रमाणपत्र देतो काय? असा प्रश्न जाहीर पणे विचारला होता. पण त्याच शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांच्याविरुध्द कोट्यावधी रुपयांची सिंचन घोटाळ्याची संचिका सरकार बनविल्याबरोबर धुतल्या गेली होती. ते काही लोक विसरले नाहीत. तेंव्हा भारतीय जनता पार्टीला काय हवे ते मिळविण्यामध्ये त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहतात हे भारतीय जनतेने पाहिले आहे. पण त्यांनी केलेले काम आणि त्या कामातून मिळवलेले विविध यश याबद्दल मात्र महाराष्ट्र जनतेत खुप आनंद नाही. महाराष्ट्राच्या हक्कांचे अनेक प्रकल्प गुजरातला नेले. मग मराठी माणसाची वाट लावली ती वाट आता त्यांना दाखविण्याची वेळ आहे असे आम्हाला वाटते.