शहाजी राजे आजही एका पोलीस अंमलदाराच्या आदेशावर पोलीस उपनिरिक्षक काम करत आहेत
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रात शहाजी राजांनी अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याची मोहिम सुरू केली. परंतू आजही नांदेडमध्ये छुप्या मार्गांनी आणि काही लोकांच्या मदतीने अवैध वाळु उपसली जात आहे, विक्री केली जात आहे. हा प्रकार 22 ऑक्टोबर रोजी एका पोलीस अंमलदाराच्या 10-12 दुरध्वनीनंतर पोलीस उपनिरिक्षकाने भनगी गावातून भरून आलेली अवैध वाळुची गाडी सोडून दिली आहे. याकडे कोण पाहिल शहाजी राजे.
शहाजी राजांच्या मनातील अवैध अवैध धंद्यातील समुळ उच्चाटन या सदरात अवैध पणे वाळु उपसा करून, शासनाचा महसुल बुडवून विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करणे हा एक भाग पण आहे. महसुल कायद्यानुसार रात्रीच्यावेळी अर्थात सुर्यास्त ते सुर्योदय या काळात वाळुची वाहतुक सुध्दा करता येत नाही. परंतू हा प्रकार राजरोसपणे नांदेड जिल्ह्यात सुरूच आहे. काही दिवसांपुर्वीच भनगी गावात छापा टाकून पोलीस विभागाने आणि महसुल विभागाने मोठा वाळुचा साठा जप्त केला. त्या बद्दल कोणताही गुन्हा मात्र नोंद झाला नाही. महसुल विभागाला गुन्हा दाखल करण्याची गरज वाटली नसेल. कारण पोलीसांचा तर वाळु या विषयाशी काही एक संबंध नाही असे अनेक पोलीस अधिकारी सांगतात. त्यामुळे त्यांनी तक्रार देण्याचा प्रश्नच आला नसेल.
या सर्व प्रकारात 22 ऑक्टोबरच्या रात्री एक भयंकर प्रकार घडला. रात्रीची गस्त करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यानी भनगी गावातूनच भरून आलेली एक वाळुची गाडी ताब्यात घेतली आणि ती गाडी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याकडे नेत असतांना पोलीस उपनिरिक्षकांच्या मोबाईल फोनवर एका पोलीस अंमलदाराने 10 ते 12 कॉल केले. त्यानंतर मात्र पोलीस उपनिरिक्षकांनी अवैध वाळुची गाडी सोडून दिल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार 22 ऑक्टोबरच्या रात्री 9.30 ते 11.30 या दरम्यानचा आहे. याची सत्यता जाणण्यासाठी त्या दिवशीची रात्रीची गस्त कोणत्या पोलीस उपनिरिक्षकांच्या नेतृत्वात होती. हा तर अभिलेख असेल. तसेच त्या पोलीस उपनिरिक्षकांच्या मोबाईलवर आलेल्या कॉलची रेकॉर्डींग हा सुध्दा अभिलेख असेल. फोन करणारा पोलीस अंमलदार फक्त भिंत बदलून बदली झालेला आहे. कागदोपत्री त्या पोलीस अंमलदाराची नियुक्ती दुसऱ्या शाखेत असतांना सुध्दा तो पहिल्याच शाखेत आजही कार्यरत आहे. शहाजी राजांनी या गुपचूप चाललेल्या प्रकाराकडे लक्ष द्यावे. तरच खऱ्या अर्थाने अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन होवू शकेल. नसता कागदोपत्री अभिलेख तयार केले जातील आणि अभिलेखांचा आधारावर आम्ही अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन केले असे दाखवले जाईल. पण प्रत्यक्षात तसे होणार नाही.