नांदेड(प्रतिनिधी)-विधी व न्याय विभागाच्यावतीने राज्यभरातील 397 विधी अधिकाऱ्यांना पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. नांदेड जिल्ह्यात पाच विधी अधिकाऱ्यांना ही मुदतवाढ मिळाली आहे. विधी व न्याय विभागाच्या कार्यासन अधिकारी वैशाली बोरुडे यांच्या स्वाक्षरीने ही अधिसुचना 14 ऑक्टोबर रोजी निर्गमित झाली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयातील विधी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस शासन निर्देशानुसार पुढील दोन वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात ऍड.रणजित नरसींगराव देशमुख, ऍड.संदीप भिमराव कुंडलवाडीकर, ऍड.यादव प्रकाश तळेगावकर, ऍड.महेश भगवानराव कागणे आणि ऍड.मिनाकुमारी आप्पाराव बत्तुल्ला(डांगे) या पाच जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात सत्र न्यायालय नांदेड शहराशिवाय कंधार,भोकर आणि मुखेड येथे आहे. मुखेड येथील न्यायालय हे कंधारचे जोड न्यायालय आहे. नांदेड शहरात सुध्दा जवळपास 7 सत्र न्यायालय आहेत. या सर्व न्यायालयामध्ये असलेल्या कामकाजाच्या स्वरुपात नांदेड जिल्ह्यालाला मिळालेले पाच विधी अधिकारी ही संख्या कमी आहे.
राज्यभरात जिल्हा निहाय मुदतवाड मिळालेल्या विधी अधिकाऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे.नागपूर-29, अहमदनगर-21, अकोला-8, अमरावती-17, औरंगाबाद-18, बीड-15, बुलढाणा-11, भंडारा-3, चंद्रपूर-7, धुळे-6, गडचिरोली-3, गोंदिया-5, जालना-7, जळगाव-16, कोल्हापूर-14, लातूर-15, मुंबई सत्र न्यायालय-31, मुंबई नगर दिवाणी न्यायालय-7, नांदेड-5, नंदुरबार-5, नाशिक-15, उस्मानाबाद-8, परभणी-13, पुणे-24, रायगड-8, रत्नागिरी-6, सांगली-9, सातारा-11, सिंधदुर्ग-2, सोलापूर-16, ठाणे-15, वाशिम-7, वर्धा-4, यवतमाळ-16 असे एकूण 397 मुदतवाढ मिळालेली विधी अधिकारी आहेत.
विधी व न्याय विभागाने राज्यभरातील मुदवाढ दिलेल्या विधी अधिकाऱ्यांची पिडीएफ संचिका वाचकांच्या सोयीसाठी बातमीसोबत जोडली आहे.
All District – DGP- AGP & APP List