नांदेड(प्रतिनिधी)-कमी वेळात जास्त पैसे मिळविण्याचा नाद हा आजच्या युगातील सर्वात मोठा घातक विषय आहे. यातच दोन मित्र फसले आणि 70 लाख रुपये गमावून बसले. या बाबत त्यांनी पोलीसांनीकडे अर्ज करून मदत मागितली आहे. परंतू आता कायद्याच्या दृष्टीकोणातून हा विषय पोलीसांनी कार्यवाही करण्याचा आहे की, नाही हा एक वेगळा विश्लेषणाचा विषय आहे. सध्या तो भामटा हैद्राबादमध्ये वातानुकूलीत चार चाकी गाड्यांमध्ये फिरत आहे.
जून महिन्यात सद्दाम हुसेन महम्मद सलतनत यांनी दिलेल्या अर्जानुसार शेख अकबर शेख चुन्नू (33) रा.लेबर कॉलनी नांदेड याने त्यांना दिलेल्या अमिषाप्रमाणे भुखंडातून श्रीखंड खाऊन आणि लवकर पैसे कमावू असे आमिष त्यांना दाखविले. त्यामुळे त्यांनी 45 लाख रुपये रोख रक्कम शेख अकबर शेख चुन्नूला दिली. तसेच त्यांचे मित्र मोहम्मद इरफान गज्जनअली यांनी सुध्दा 25 लाख रुपये दिले असे 70 लाख रुपये भुखंडांचा व्यवसाय करण्यासाठी होते. 70 लाख रुपये गुंतवणाऱ्या दोघांना शेख अकबर शेख चुन्नूने प्रत्येकी 2 लाख रुपये दिले. परंतू त्याने कोणतेही भुखंड खरेदी केलेले नाही अशी माहिती समजल्यानंतर शेख अकबर आणि त्यांचे मित्र मोहम्मद इरफान यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. परंतू मी भुखंडांचा व्यवसाय करत आहे. लवकरच तुमचे पैसे देईल असे सांगणारा शेख अकबर पळून गेला.
या शेख अकबरला त्याचा भाऊ शेख अमजद शेख चुन्नूमियॉ, त्याचा सासरा जकी अहेमद खान, पत्नी शेख उजमा, भाऊ शेख मुनवर आणि आई शेख वहिदा हे सर्व त्याला मदत करतात. आज शेख अकबर कोठे आहे हे त्यांना माहित असतांना सुध्दा ते आम्हाला सांगत नाहीत. शेख अकबर चे सासरे जकी अहेमद खान हे एसबीआय शाखा नवा मोंढा येथे कॅशीअर पदावर नोकरीला होते. त्यांनी बॅंकेत सुध्दा घोटाळा केला असेल अशी आम्हाला शंका आहे. या अर्जासोबत सद्दाम हुसेन यांनी केलेल्या करारनाम्याचा मुद्रांक कागद आणि शेख अकबर शेख चुन्नूने दिलेले कोरे धनादेश जोडले आहेत.
सद्दाम हुसेन सांगत होते की, शेख अकबर हा सध्या हैद्राबादमध्ये असून तेथे तो वातानुकूलीत चार चाकी गाड्यांमध्ये फिरत आहे. सद्दाम हुसेन यांनी पोलीसांना दिलेल्या अर्जातील मजकुराप्रमाणे पोलीसांना काय करता येईल हा विषय वेगळा चर्चेचा आहे. सन 2023 मध्ये त्यांनी ते पैसे दिलेले आहेत. त्यावेळी भारतीय दंड संहिता अस्तित्वात होती म्हणून फसवणूकीची भारतीय दंड संहितेतील कलमे यास लागू होतात. परंतू फसवणूकीच्या अर्जांवर सध्याच्या परिस्थितीत पोलीस विभाग थेट गुन्हा दाखल करत नाही. त्याची चौकशी होते आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच हा गुन्हा दाखल होतो. एकंदरीत कोणीही आमिष दाखवले तर त्या आमिषाला बळी पडतांना त्या आमिषात किती सत्यता आहे. आमिष दाखवणाऱ्यामध्ये किती दम आहे याची तपासणी सदाम हुसेन आणि मोहम्मद इरफान यांनी केली असती तर आज त्यांच्यासमोर आलेली परिस्थिती आलीच नसती. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक वळणावर दक्ष राहणे आवश्यक आहे.