स्थानिक गुन्हा शाखेने दोन गावठी पिस्टल आणि चार जीवंत काडतुसे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने चार जणांना पकडून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि चार जीवंत काडतुस पकडले आहेत. तसेच त्यांचे चार चाकी वाहन असा एकूण 3 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार विजयादशमीच्या पहिल्या दिवशी त्यांनी मौजे पार्डी(मक्ता) येथील टोल नाक्याजवळ धनश्री कृषी सेवा केंद्राजवळ जावून माधव अनंतराव नंदनकर (26) शिवनगर महाराणा प्रताप चौक नांदेड, आकाश अनंतराव साखरे (25) रा.स्वयंवर मंगल कार्यालय, छत्रपती चौक नांदेड, चंद्रमणी मारोती कांबळे (23) रा.जुनी अबादी मुदखेड जि.नांदेड, प्रतिक एकनाथ गोरे(35) रा.सिध्दार्थनगर चैतन्यनगर नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ दोन गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) आणि चार जीवंत काडतुसे सापडली. पोलीसांनी या चौघांजवळ असलेली चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.38 जे.3132 जप्त केली. असा एकूण 3 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कार्यवाही स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, विलास कदम, बालाजी कदम, संतोष बेल्लुरोड, संदीप घोगरे, तिरुपती तेलंग, घेवारे, अकबर पठाण आणि सायबर सेलचे राजू सिटीकर यांनी पुर्ण केली.
पोलीस अधिक्षक उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव आदींनी दसरा सणाच्या पार्श्र्वभूमीवर पोलीसांनी केलेल्या या कार्यवाहीचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!