नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर राज्यभरातील 131 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक या पदावर पदोन्नती देवून नवीन पदस्थापना दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील 27 पोलीस अंमलदारांचा यात समावेश आहे.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यभरातील 131 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती देवून त्यांना नवीन पदस्थाना दिली आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील 27 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातील पदोन्नती मिळालेले पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे.
विठ्ठल एकनाथ कत्ते (पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर), संजय अंबादासराव जोशी(नांदेड परिक्षेत्र), चंद्रकांत धोंडीबा कदम, बालाजी लक्ष्मण महागावकर, गणेश नरसिंगराव नव्हाते, महेंद्र माधवराव नागुलवार, सुभाष खंडू कदम, सुरेश सुभानजी वाघमारे, पिराजी लालु गायकवाड , व्यंकटी तुकाराम पोकले, जावेद खान वाहेद खान पठाण, बालाजी जीवनाजी चौरंगे, मधुकर नागोराव पवार, बालाजी गंगाराम काळे, वसंत सुखाजी चव्हाण, मारोती नारायण तेलंगे, दिलीप पुनमचंद जाधव, ओम प्रकाश पुंडलिकराव घोडके(मुंबई शहर), अनिल महादु पोहरे, बाबा नागोराव गजभारे, सुभाष संभाजी पवार, उत्तम माधवराव डोईबळे, देविदास बापुराव बिसाडे, शेख आयुब शेख इमाम साब, सुदाम अमरु आडे, सुधाकर संग्रामसिंग राठोड, अशोककुमार भिमराव गुडपे (नांदेड परिक्षेत्र) असे आहेत.
वाचकांच्या सोयीसाठी या संदर्भाची सर्व 131 पोलीस अंमलदारांच्या पदोन्नतीची पीडीएफ संचिका बातमीसोबत जोडत आहोत.