नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस असल्याची बतावणी करून फसवणुक करण्याचे प्रकार काही बंद होत नाहीत. 8 ऑक्टोबर रोजी सुध्दा एका 68 वर्षीय व्यक्तीची अशी फसवणूक झाली आहे.
रामनगर हाऊसिंग सोसायटी हनुमानगड येथे राहणाऱ्या बापुराव संभाजी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता ते सांगवी ब्रिज वरुन आपल्या दुचाकीवर येत असतांना 2 जणांनी त्यांना थांबवून आम्ही क्राईम ब्रॅंचचे आहोत अशी बतावणी करून 5 ग्रॅम सोन्याची अंगठी ज्याची किंमत 5 हजार रुपये लिहिलेली आहे. ती घेवून गेले आहेत. विमानत ळ पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 319(2), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 415/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक कल्याणकर हे करणार आहेत.