नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र स्टेट वेटरंन्स ऍक्वेटीक असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये नांदेडच्या अनुभवी पोलीस अंमलदाराने तीन सुवर्ण आणि दोन रजत पदके प्राप्त करून नांदेड जिल्हा पोलीस दलाचे नावे उज्वल केले आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पोलीस अंमलदाराचे कौतुक केले आहे.
दि.21 आणि 22 सप्टेंबर 2024 रोजी नागपुर येथे महाराष्ट्र स्टेट वेटरंन्स ऍक्वेटीक असोसिएशनच्यावतीने अनुभवी खेळाडूंसाठी जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये मुंबई, नागपूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अमरावती, नांदेडसह इतर जिल्ह्यातून 550 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धे नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार जयप्रकाश मोतीराम क्षीरसागर या ज्येष्ठ पोलीस अंमलदाराने भाग घेतला. क्षीरसागर यांनी स्पर्धेतील 50 मिटर बटरफाल्य, 4×50 मिटर निडलेरिले, 4×50 मिटर फ्रिस्टाईरिले या तिन जलतरण प्रकारांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच 100 मिटर बटरफाल आणि 50 मिटर फ्रिस्टाईल स्पर्धेत 2 रजत पदक प्राप्त केले. या जलतरण स्पर्धेत जयप्रकाश मोतीराम क्षीरसागर यांनी मिळावलेल्या यशासाठी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांचा सन्मान करून बक्षीस दिले आहे. अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्र्विनी जगताप, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे यांनी जयप्रकाश क्षीरसागरचे अभिनंदन करून भविष्यातील स्पर्धांसाठी त्यांना शुभकामना दिल्या आहेत.