नांदेड येथील दोन वसतिगृहाचा समावेश
नांदेड :- राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी एक व मुलींसाठी एक याप्रमाणे 36 जिल्हयामध्ये 72 वसतिगृह सुरु करण्यासाठी शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान केली आहे. यामध्ये एक शासकीय मुलांचे वसतिगृह, काळेश्वर नगर, विष्णुपुरी नांदेड, एक शासकीय मुलींचे वसतिगृह, दिपनगर नांदेड या दोन वसतीगृहाचा समावेश आहे.
राज्यातील 36 जिल्ह्यातील 72 शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन दुरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या 9 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1.30 वाजता नागपुर येथून संपन्न होणार आहे. नांदेड येथे हा कार्यक्रम दुरदृश्य प्रणालीद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सभागृह ग्यानमाता इंग्रजी शाळेच्या समोर होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.
राज्यातील शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख अतिथी गृहनिर्माण , इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, प्रमुख अतिथी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे उपस्थित रहाणार आहेत.
नांदेड येथील कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार डॉ.शिवाजी काळगे, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार माधवराव पा. जवळगावकर आमदार बालाजी कल्याणकर आमदार भिमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहन हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक (विभाग) लातूरचे उपसंचालक दिलीपकुमार राठोड याची विशेष उपस्थिती राहणार आहे.