सचखंड पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिकांविरुध्द दंडात्मक व सक्तीची कार्यवाही करा-नंबरदार

नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका अनिलकौर खालसा यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका आहे. त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निवेदन गुरूद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजयसतबिरसिंघ यांना सामाजिक कार्यकर्ते सरदार जगदिपसिंघ नंबरदार यांनी दिले आहे.
गुरुद्वारा बोर्डातर्फे चालविल्या जाणाऱ्या सचखंड पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका अनिलकौर खालसा यांनी जानेवारी 2023 मध्ये गुरुग्रंथ साहिब भवन येथे एम.एस.ओ.एफ. ऑलिम्पियाड-2 परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेसंदर्भाने सचखंड साहिब भवनचा किराया गुरुद्वारा बोर्डाकडे जमा न करता त्या रक्कमेचा धनादेश क्रमांक 798636 द्वारे ती रक्कम त्यांनी आपले पती जसप्रितसिंघ खालसा यांच्या नावाने मागवली आणि आर्थिक गैरव्यवहार केला आहे. या सर्व प्रकरणाची माहिती गुरुद्वारा बोर्ड अधिक्षकांना सुध्दा आहे. तरी त्यांनी काही कार्यवाही केली नाही.
या प्रकरणी एक सामाजिक कार्यकर्ता विशाल डुकरे यांनी 10 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांना एक तक्रार केली. या कार्यवाहीमध्ये गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना कार्यवाहीसाठी पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे. गुरुद्वारा बोर्ड व आपण स्वत: मुख्याध्यापिका खालसा यांना पाठीशी घालत असल्याचे कडक शब्द त्या पत्रात आहेत.
अनिलकौर खालसा यांना गुरुद्वारा बोर्डात सन 2018 मध्ये नोकरीस घेतले तेंव्हा त्या सहशिक्षीका होत्या. गुरुद्वारा बोर्डातील वरिष्ठ कर्मचारी यांना वगळून अनेकदा पदोन्नती देवून त्यांना मुख्याध्यापिका पद बहाल करण्यात आले. त्यांना नोकरीत घेतले तेंव्हा त्यांच्याकडे मुख्याध्यापिका होण्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता नव्हती. या प्रकरणी स्वत: जातीने लक्ष घालून गुरुद्वारा बोर्डाची बदनामी होणार नाही याची दक्षता घ्याव असे शब्द सरदार जगदीपसिंघ नंबरदार यांनी आपल्या निवेदनात लिहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!