परभणी(प्रतिनिधी)- आम्ही या जगात जन्म घेतला आहे. त्याचासाठी आम्ही समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतुन सहाय्यक पोलीस निरिक्षक गजानन मोरे यांनी आपल्या बालकांचा जन्मदिवस वृध्दाश्रमात साजरा केला.
प्रत्येक व्यक्तीने मानवी जीवनात मिळालेले त्याचे जीवन हे, समाजाच्या देण्यासाठी आहे याच भावनेतून परभणी जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक गजानन मोरे यांनी आपली मुलगी श्रीजा हिचा पाचवा वाढदिवस आणि मुलगा श्रीवल्भ याचा पहिला वाढदिवस असोला फाटा परभणी येथील वृध्दाश्रमात साजरा केला. तेथे असणाऱ्या मायमाऊल्यांना आपण आपल्याच नाती-नातवाचा वाढदिवस साजरा करत आहोत याचा आनंद झाला. या कार्यक्रमात वृध्दाश्रमातील माय-माऊल्यांना दररोज वापरात येणाऱ्या वस्तुंचे किट भेट देण्यात आले. तसेच गजानन मोरे यांच्यावर प्रेम ठेवणाऱ्या लोकांनी या ठिकाणी रक्तदान केले.52 व्यक्तींनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजन आणि नियोजनात अरविंद गजभारे, इमरान कादरी, माणिकराव डुकरे, रामकिशन काळे यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला.