बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक जाहीर

नांदेड  :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी  परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा व तपशील पुढीलप्रमाणे आहे.

नियमित शुल्कासह उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने मंगळवार 1 ऑक्टोंबर ते बुधवार 30 ऑक्टोबर 2024 हा कालावधी आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocational Stream)सर्व शाखाचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने ऑनलाईन भरावयाच्या तारखा मंगळवार 1 ऑक्टोंबर ते बुधवार 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहेत. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरणा करणे व आरटीजीएस / एनईएफटी पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे याची सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख / प्राचार्यांनी नोंद घ्यावी.

सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी कॉलेज  प्रोफाईल मध्ये कॉलेज , संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे.

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगीनमधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टर नुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्ट वर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी.त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख, प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

इयत्ता 12 वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यानी आवेदनपत्र त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.  उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदनपत्र स्विकारण्यासाठी सरल डाटाबेस विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे. सदर सरल डाटावरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भराण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) आयटीआय नियमित विद्यार्थ्यानी माहिती सरल डाटाबेस मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित पद्धतीने ऑनलाईनच भरावयाची आहेत असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!