आता रुग्णांची संख्या 700 झाली
नांदेड,(प्रतिनिधी)- अतिसारामुळे नेरली गावात त्रासलेल्या लोकांची दवाखान्यातील संख्या आता जवळपास 700 झाली आहे. कोण जबाबदार या परिस्थितीला, मोठे अधिकारी आपले फोटो काढण्यातच मस्त असतात आणि सुरुवातीला मी नाही त्यातली म्हणणारे सर्वच तसेच असतात. याचाच प्रत्येक या नेरली गावाने समोर आणला आहे.
नेरली गावात पाण्यातील खराबीमुळे अतिसाराची लागण झाली. काल शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारी प्रमाणे 273 पेक्षा जास्त लोक दवाखान्यात ऍडमिट आहेत.आज सकाळी ही संख्या 700 च्या जवळ गेली आहे. जाणकार लोकांनी सांगितले या परिस्थितीमध्ये ज्यांची इम्युनिटी पावर चांगली आहे ते लवकर बरे होतील. लहान बालके आणि वृद्ध यांना थोडा जास्त काळ उपचार द्यावा लागेल. जाणकारांनी सांगितले की पाण्यामध्ये क्लोरी फॉर्म आणि आणि इ क्वाॅइल या विषाणूंचा प्रभाव असेल आणि त्यामुळेच हा अतिसराचा प्रसंग उद्भवला आहे क्लोरीफॉर्म आणि ई कॉइल हे जंतू एका पाण्याच्या थेंबात कोट्यावधीच्या संख्येत असतात आणि याला दुरुस्त करण्यासाठी पाणीपुरवठा करण्या अगोदर 34% क्लोरीन असलेले ब्लिचिंग पावडर 1000 लिटर पाण्यात पाच ग्रॅम टाकले तरी असा प्रसंग उद्भवणार नाही. प्रत्येक गावात क्लोरीन अर्थात ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याचा अधिकार ग्रामसेवकाचा असतो एखाद दोन थैले खरेदी करून वर्षभरातील बिले उचलण्यात मग्न अनसणाऱ्या या परिस्थितीत जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नाही.
मोठमोठे प्रशासकीय प्रशासकीय अधिकारी आपल्या सेवा काळाच्या सुरुवातीस मी नाही त्यातली म्हणणारे सर्वच प्रशासकीय अधिकारी नंतर या जगाच्या ओघात तसेच बनतात जसे जगाची आवश्यकता आहे परंतु आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपल्या गरजा बदला पण आपल्या गरजांसाठी माणसे बदलू नका या वाक्याचा विसर सर्वांनाच पडला आहे.
जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जो धाक सुरुवातीला दाखवला तो आता शिल्लक राहिलेला नाही. फक्त फोटो काढून आणि काही विक्री झालेल्या पत्रकारांना सोबत घेऊन जग चालत नसते.कुठेतरी सत्यता बाहेर येते. पाण्याच्या टाकीमध्ये क्लोरीन युक्त ब्लिचिंग पावडर टाकण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. त्यासाठी शासनाने भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रमुख मीनल करणवाल आहेत मग कोणाच्यावतीने या कामावर लक्ष ठेवले जाते याचे काही एक उत्तर मिळाले नाही. मी काय काय करू असे उत्तर अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी देतात मग ती जबाबदारी कोणी तुम्हाला जबरदस्तीने दिली नव्हती. तुम्ही आपल्या मर्जीने ती स्वीकारलेली आहे, आणि त्यातून भरपूर काही मिळत आहे. तरीपण त्यासाठी तुम्ही वेळ देणार नाहीतर जनतेने कोणाकडे पहायचे.
या पाण्याच्या टाकीतून अतिसाराचा प्रसंग उद्भवला आहे ते पाणी आसना नदीतून टाकीत येते आणि आसना नदीमध्ये असलेल्या एका विहिरीतून अर्ध्या गावाला पाणी जाते मग अर्ध्या गावातील लोकांना काही झाले नाही. पण टाकीतून आलेले पाणी पिणाऱ्या लोकांना अतिसार उद्भवला आहे. नदीजवळ विष्टा करणाऱ्या महाभागांची कमतरता नाही आणि त्या विष्टेतूनच जीव विषाणू तयार होतात आणि त्या विषाणूमुळेच हा प्रसंग घडलेला आहे. म्हणजे टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर आणि ते सुद्धा गुणवत्ता असलेले 35 टक्के क्लोरिन असलेले आवश्यक आहे. कोण जबाबदार यासाठी कोणावरही जबाबदारी निश्चित केली जाणार आणि काय कार्यवाही होणार हा खूप मोठा विषय आहे त्यासाठी एखादा पीएचडी धारक व्यक्ती नेमावा लागेल.