नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेत नव्याने आलेल्या एका पोलीस अंमलदाराने जुन्या लोकांच्या कामांमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे बेबनाव झाला आहे.नव्याने आलेल्या पोलीस अंमलदाराला सर्वच काही हवे आहे. असा संदेश या प्रकरणातून बाहेर आला.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेमध्ये नव्याने आलेल्या एका पोलीस अंमलदाराचे रेती धोरणाविषयक प्रशिक्षण सुरू आहे. त्यातच त्याने एका जुन्या पोलीस अंमलदाराकडे असलेल्या कामामध्ये दखल दिला. हे काम माझे आहे या शब्दांवरुन वाद झाला. तेंव्हा मला त्या कामासाठी पोलीस निरिक्षकांनी पाठविले होते असे उत्तर नवीन पोलीस अंमलदाराने दिले. जुना पोलीस अंमलदार जुनाच आहे. त्याची सर्वत्र ओळख आहे आणि मागील बऱ्याच वर्षापासून तोच ते काम करत आला आहे. त्या कामातील बारकावे त्यालाच माहित आहेत. जुन्या पोलीस अंमलदाराचा असा आरोप आहे की, माझ्या कामात दखल का दिली. यावरून हा वाद पेटला अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
जुना आणि नवीन हा प्रत्येक जागी होतच असतो. नव्यांनी काही काळ धीर धरायला हवा. पण स्थानिक गुन्हा शाखेत आलेल्या पोलीसांना धीर काय असतो हे कुठे माहित आहे. एक म्हण रुढ आहे, “जगात भरपूर संपत्ती आहे परंतू सर्व आपल्या…..नसते.’ या म्हणीच्या आधारे तर शिकायला हवे. नव्या आलेल्या पोलीस अंमलदाराला पाच वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे. म्हणजे भरपूर वेळ आहे.तरीपण स्थानिक गुन्हा शाखेतील वाद आता बाहेर आला आहे.