नांदेड(प्रतिनिधी)-किनवट शहरातील गोकुंदा येथे बाहेरगावी गेलेल्या एका व्यक्तीचे घरफोडून चोरट्यांनी 6 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत 130 ग्रॅम सोने सोन्याची किंमत जुने वापरते अशी दाखवली आहे.तसेच सरपंचनगर पाटीजवळ साईप्रसादनगर येथे चोरट्यांनी एका 51 वर्षीय व्यक्तीच्या हातातील 10 हजार रुपयांचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे.
गोकुंदा येथील मुर्तूजा खान मुस्ताक खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे भाऊ मुसा खान मुस्ताक खान हे 22 सप्टेंबर रोजी आपले घर बंद करून कुटूंबांसह मुंबई येथे गेले होते. 23 सप्टेंबरच्या सकाळी 10 वाजता त्यांचे बंद घर कोणी तरी चोरट्यांनी फोडून घरातील प्लायवुडचे कपाट फोडले आणि सामान अस्तव्यस्त फेकुन 103 ग्रॅम सोने, 20 ग्रॅम चांदी व रोख रक्कम असा एकूण 6 लाख 95 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार आली. 130 ग्रॅम सोन्याची आजची किंमत 9 लाख रुपयांपेक्षा जास्त होते. किनवट पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 284/2024 नुसार नोंदवली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरिक्षक चोपडे हे करीत आहेत.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरपंचनगर पाटी जवळ 20 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजता केरबा मारोती कसारे (51) हे आपल्या पुतण्याच्या मुलाला साप चावल्याने त्याला दवाखान्यात भेटून घरी पायी जात असतांना दोन जणांनी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर येवून त्यांच्या हातीतील 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 473/2024 नुसार दाखल केली आहे. पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.