नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका चोरट्याला पकडून चोरीच्या 11 दुचाकी गाड्या किंमत 4 लाख 60 हजार रुपयांच्या जप्त केल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात बऱ्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनेक दुचाकी गाड्या चोरीचे गुन्हे प्रलंबित होते. यासंबंधाने शोध घेत असतांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विकास ग्यानबा घाडगे रा.गणपुर कामठा ता.अर्धापूर यास ताब्यात घेतले. त्याने सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्याने इतर दोन साथीदारांसह मिळून लिंबगाव हद्दीतून चार दुचाकी गाड्या, विमानतळ हद्दीतून एक दुचाकी गाडी अर्धापूर येथून दोन दुचाकी गाड्या, बारड आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक गाडी अशा 11 दुचाकी गाड्या चोरल्या आहेत. पोलीसांनी 4 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या या 11 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत आणि विकास घाडगेला अटक केली आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, रवि बामणे, बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, बालाजी यादगिरवाड, सायबर सेलचे राजू सिटीकर आणि दिपक ओढणे यांच कतुक केले आहे.
्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या गाड्या वाहनतळ करत असतांना आवश्यकती काळजी घ्यावी तसेच कोणी कमी किंमतीत दुचाकी गाड्या देत असेल तर त्याबाबत पोलीसांशी संपर्क साधावा. स्थानिक गुन्हा शाखेने जप्त केलेल्या 11 गाड्यांमध्ये चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आले आहेत.