नांदेड(प्रतिनिधी)-उद्या श्री.गणेश विसर्जनाच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस विभागाने शहरातील बरेच रस्ते बंद केले आहेत आणि त्यांना पर्यायी मार्ग दिले आहेत. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, उद्याचा प्रवास वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग याची जाणिव ठेवूनच प्रवासाचे नियोजन करावे.
उद्या भाद्रपद चर्तुदशी म्हणजे दहा दिवसाच्या गणेश उत्सव सोहळ्याचा विसर्जन दिन. यासाठी शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने गणेश विसर्जनाची सोय तयार ठेवण्यात आली आहे. वाजत गाजत गणरायाला निरोप दिला जातो. त्यासंदर्भाने पोलीस अधिक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील 1936 प्रमाणे दि.17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गणपती विसर्जनासाठी रस्ता राहावा म्हणून काही रस्ते बंद ठेवले आहेत. परंतू त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.
वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग:- बर्की चौक ते जु मोंकडे येणारी वाहतुक पुर्णपणे बंद राहिल. जुना मोंढा-देना बॅंक-महाविर चौक-तरोडेकर मार्केट-वजिराबाद चौक-कलामंदिर-शिवाजीनगर ते आयटीआय चौकापर्यंत जाण्या-येण्याची वाहतुक पुर्णपणे बंद राहिल. राजकॉर्नरकडून आयटीआयकडे येण्यासाठी राज कॉर्नर-वर्कशॉप टी पॉईंट-श्रीनगर-आयटीआयपर्यंतची डावी बाजू वाहतुकीसाठी बंद राहिल. राज कॉर्नर ते तरोडा नाका जाण्यासाठी वाहतुकीला डावी बाजू बंद राहिल. सिडको-हडकोकडून कौठा नाका मार्गे नवीन पुलावरून जुना मोंढाकडे येणारी वाहतुक पर्णपणे बंद राहिल. जुना मोंढ्यातून नवीन पुल मार्गे सिडको-हडको जाण्या-येण्यासाठी वाहतुक पुर्णपणे बंद राहिल. लातूरफाटा येथून सिडको-हडकोकडे जाणारा मार्ग जड वाहनांसाठी बंद राहिल. यात्री निवास ते जुना मोंढा-बर्की चौक पुर्णपणे बंद राहिल. सिडको-हडको तसेच लातूर फाटा भागातून नांदेड शहराकडे नावघाट पुलावरून इतवारा भागात व नवीन पुलावरून जुना मोंढा भागात येणारी वाहतुक पुर्णपणे बंद राहिल.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग:- बर्की चौकाकडून जुना मोंढाकडे येणारी वाहतुक महम्मदअली रोड- भंगार लाईन-गिट्टी क्रेशर चौक-बाफना टी पॉईंट या रस्त्याचा जाण्या-येण्यासाठी वापर करता येईल. जुना मोंढा ते राजकॉर्नर मार्गावरील वाहतुक अबचलनगर-यात्री निवास-अण्णाभाऊ साठे चौक-नागार्जुना टी पॉईंट-आनंदनगर-भाग्यनगर वर्कशॉप कॉर्नर, राज कॉर्नर ते पुढे जाण्या-येण्यासाठी वापरता येईल. वजिराबाद चौकातून श्रीनगर-वर्कशॉपकडे जाणारी वाहतुक वजिराबाद चौक-तिरंगा चौक-पोलीस मुख्यालय-लालवाडी अंडर ब्रिज-शिवाजीनगर पिवळी गिरणी ते गणेशनगर वाय पॉईंटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करता येईल. रविनगर जुना कौठा ते गोवर्धनघाट पुलावरून नांदेड शहरात येणारी वाहतुक तिरंगा चौक-पोलीस मुख्यालय-लालवाडी अंडर ब्रिज-पिवळी गिरणी ते गणेशनगर वॉय पॉईंटकडे जाण्यासाठी वापरता येईल. सिडको-हडकोकडून येणारी वाहतुक साई कमान-रविनगर -गोवर्धनघाट पुल-तिरंग चौक मार्गे गणेशनग वाय पॉईंटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करता येईल्. जुन्या मोंढ्यातून सिडको-हडकोकडे जाण्या-येण्यासाठी भगतसिंघ रोड-कविता हॉटेल-बाफना-देगलूरनाका-जुना पुल या मार्गाचा वापर करता येईल. लातूरफाटा ते दुध डेअरी या मार्गावर धनेगाव चौक या मार्गावर जड वाहनासाठी खुला राहिल. यात्रीनिवास ते जुना मोंढा-बर्की चौक मार्गावरील वाहतुक मोहम्मअली रोड किंवा धान्य मार्केट किंवा बर्की चौक ते लोहारगल्ली रस्ता भगतसिंघ चौक अबचलनगर यात्रीनिवास चौकी किंवा बाफना टी पॉईंट आणि पुढे जाण्या-येण्यासाठी सुरू राहिल. लातूरफाटा-सिडको-हडको-ढवळे कॉर्नर-चंदासिंघ कॉर्नर-धनेगाव चौक-वाजेगाव-जुना पुल-देगलूरनाका-रजा चौकमार्गे माळटेकडी येण्या-जाण्यासाठी सुरू राहिल.