रेती चोरणारे दोन टिपर लिंबगाव पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-चोरीची रेती घेवून जाणाऱ्या दोन टिपरला पकडून लिंबगाव पोलीसांनी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
लिंबगाव येथील पोलीस अंमलदार प्रकाश पेद्देवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर 2.30 वाजता त्यांनी सुगाव (बु) ता.जि.नांदेड येथे टिपर क्रमांक एम.एच.04 डी.के.6102 आणि एम.एच.12 ई.एफ.8940 यांची तपासणी केली. त्यामध्ये शासनाचा महसुल न भरता बेकायदेशीररित्या चोरून अणलेली वाळू होती. लिंबगाव पोलीसांनी 2 टिपर आणि वाळू असा एकूण 10 लाख 20 हजारांचा मुद्देमाल या प्रकरणी जप्त केला आहे. या गुन्ह्यात आरोपीच्या सदरात बालाजी त्र्यंबक नरवाडे रा.धानोरा मलकु ता.जि.नांदेड, देवानंद गंगाधर सुर्यवंशी रा.दर्यापुर ता.जि.नांदेड, पद्माकर देविदास गायकवाड रा.शिवरायनगर नांदेड, सुनिल बालाजी पावडे रा.पावड ेवाडी ता.जि.नांदेड, दामु ग्यानोबा मोरे रा.ब्राम्हणवाडा नांदेड, मनोज सखाराम नवघरे आदर्शनगर तरोडा (खु) यांची नावे आरोपी सदरात आहेत. या सहा पैकी एकजण पोलीस अंमलदाचा सूत्र असल्याचे मजते. भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र महसुल अधिनियम 1966 मधील कलमानुसार लिंबगाव पोलीसांनी गुन्हा क्रमांक 134/2024 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एन.दळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार धुन्नर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!