नांदेड(प्रतिनिधी)-येथील परवानानगर गणेश मंडळाच्याावतीने आज विविध स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांनी आयोजित केलेल्या या स्पर्धामध्ये रांगोळी, चमचा लिंबू शर्यत, संगीत खुर्ची आणि दोरी उड्या आदी स्पर्धांचा समावेश होता.
रांगोळी स्पर्धेचे पहिले पारितोषिक पुजा शिंदे यांना मिळविले तर दुसरे पारितोषिक पौर्णिमा धुतमल व तिसरे पारितोषिक श्रध्दा धुतमल , मृणाल कोईनवाड यांनी प्राप्त केले. चमचा लिंबु शर्यत स्पर्धेचे पहिले पारितोषिक श्रध्दा धुतमल, दुसरे पारितोषिक वरुण वानखेडे व तिसरे पारितोषिक जय वाघमारे यांनी प्राप्त केले. संगीत खुर्चीचे पहिले पारितोषिक श्रध्दा धुतमल, दुसरे पारितोषिक शिवम फुलारी, तिसरे पारितोषिक सोहम दुमाने यांनी मिळविले. तसेच दोरी उड्या या स्पर्धेचे पहिले पारितोषिक श्रध्दा धुतमल, दुसरे पारितोषिक श्रध्दा ठाकूर तर तिसरे पारितोषिक राजश्री पवार यांनी प्राप्त केले.
या स्पर्धेचे परिक्षक म्हणून सुलभा डोईफोडे आणि अंजली जोशी यांनी काम पाहिले. संजीवनी वाघमारे व मीना कदम यांनी या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. पारितोषिकांचे वितरण गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश मंदिरात करण्यात येणार आहे. परवानानगरमधील 75 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरीकांचाही सत्कार यावेळी करण्यात येईल अशी माहिती गणेश मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर वाघमारे यांनी दिली.