मुंबई(प्रतिनिधी)-भारताच्या सरन्यायाधीशांनी त्यांच्या घरी झालेल्या गणपती पुजेनंतर याला उत्तर देणे आवश्यक झाले आहे. त्यांनी उत्तर दिले नाही तर ते पंतप्रधान मोदींच्या चक्रव्युहात अडकले आहेत असेच म्हणावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांच्या घरी जाऊन श्री गणेशाची पुजा व आरती केली. याचे फोटो आणि व्हिडीओ खुद्द नरेंद्र मोदींनीच व्हायरल केले. हे असे का घडल यावर मागील तिन दिवसांपासून वेगवेगळ्या विचारांवर चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांना थांबवायचे असेल तर चंद्रचुड यांनी एक उत्कृष्ट भुमिका घेण्याची गरज आहे. कारण संवैधानिक पदावर चंद्रचुड विराजमान आहेत. घडलेल्या त्या सर्व प्रकारामुळे चंद्रचुड यांच्याकडे बोट उचलले जात आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामीन मंजुर झाली. या जामीन मंजुरीमध्ये स्वाक्षरी करणारे न्यायमुर्ती दुसरेच आहेत. परंतू बोट सर्वोच्च न्यायालयाकडे उचलले जात आहे. अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानांच्या सांगण्यावरुनच जामीन मिळाली. त्यांच्यावर अनेक बंधने ला्यात आली. म्हणजे भारतीय जनता पार्टीला जे हवे आहे. ते सर्वोच्च न्यायालयाने केले अशी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रणनितीप्रमाणे केजरीवाल हरीयाणाच्या निवडणुकीत उतरतील आणि कॉंगे्रसची मते फोडतील आणि आपला पक्ष हरीयाणामध्ये निवडूण येईल अशी आहे. हे खरे असेल तेंव्हा तर भारताच्या स्वतंत्र अशा न्याय व्यवस्थेवर नक्कीच शंका घेण्यास कारण आहे.
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरतीच्या कार्यक्रमाने न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांची जास्त बदनामी झाली.कोणी म्हणतात न्यायमुर्ती चंद्रचुड यांनी राम मंदिराच्या जागेचा निर्णय झाला तेंव्हा ते सुध्दा त्या निर्णयात एक सदस्य होते. खरे तर न्यायमुर्ती चंद्रचुड यांना वारसा हक्काने न्यायदानाचा हक्क मिळालेला आहे आणि तो हक्क पुर्ण करतांना त्यांनी पारदर्शकता ठेवणे हे सर्वात महत्वपुर्ण होते आणि याच पारदर्शकतेत चुक झाली आहे. मोदी यांनी आपल्यासोबत कॅमेरे आणले तेंव्हा ते नाकारू शकले असते. परंतू त्यांनी काही म्हटले नाही. अत्यंत छोट्याशा जागेमध्ये न्यायमुर्ती चंद्रचुड यांच्या घरात श्री गणेशाची मुर्ती स्थापित करण्यात आली होती आणि त्यात सर्वांचे चेहरे येतील अशा पध्दतीने ते चित्रीकरण झाले आहे.
या संदर्भाने असेही बोलता येईल की, मोदींना चंद्रचुड यांचा कोणता निर्णय आवडला नसेल म्हणून त्यांनी सार्वजनिकरित्या मी आणि चंद्रचुड एक आहोत हे दाखवून चंद्रचुडांना अडचणीत आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तेंव्हा न्यायमुर्ती चंद्रचुड यांना हे कळले नसेल की, फोटो आणि व्हिडीओ घेवून त्याची मार्केटींग होईल. तेंव्हा चंद्रचुड यांची चुक यात आहे असे मानता येणार नाही. परंतू झालेली घटना आता सार्वजनिक झाली आहे आणि त्यावर चर्चा सुरू आहे.
दोन महिन्यात न्यायमुर्ती चंद्रचुड हे सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आपल्या पुढील जीवनासाठी त्यांनी या कार्यक्रमाची गुंतवणूक केली आहे काय? हा ही प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी 60 दिवसांची वाट पाहावी लागेल. आजही सर्वोच्च न्यायालयांमध्ये बरेच खटले केंद्र शासनाविरुध्द प्रलंबित आहेत. त्यातील गौण खनिजाचा प्रश्न जो सर्वोच्च न्यायालयाने सरकार विरुध्द निकाल दिला आहे. त्यावर केंद्र सरकारने पुर्नविलोच ाचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे सुध्दा असे घडले असेल. आज भारतभर सुरू असलेल्या चर्चा किंवा आम्ही लिहिलेले शब्द न्यायमुर्ती चंद्रचुड यांना खोटे ठरवायचे असेल तर त्यांच्याकडे 60 दिवस आहेत आणि या 60 दिवसात त्यांनी न्यायमुर्ती चंद्रचुड काय आहेत हे दाखवून देण्याची गरज आहे. नाही दाखवले तर इतर न्यायमुर्तीप्रमाणे त्यांनी सुध्दा आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाची गुंतवणूक केली हेच सत्य असेल.