नांदेड(प्रतिनिधी)-कार्ला (बु) ता.बिलोली येथे व्यक्तीचे आजार बरे करण्यासाठी अघोरी प्रथांचा अवलंब केल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन शंकरराव जामनेर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी आजारी असल्याने तिचे आजारपण बरे करण्यासाठी त्यांनी गावातील राजकुमार मल्लीकार्जुन जानेकोरे, शेख नजीर साब, दोघे रा.जोजना ता.औराद जि.बिदर आणि रमेश हनमंतराव जामनेर रा.कार्ला (बु) या तिघांना बोलवले. त्यांनी त्यासाठी घरातील चार ठिकाणी खड्डे खोदून, लोखंडी खिळे, लिंबु, कवड्या, बिबे असे पदार्थ वापरून केलेल्या कृत्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले. बिलोली पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 3(4), 2(1)(ख)(5) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर आमानुश अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळउच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम 2013 प्रमाणे गुन्हा क्रमांक 256/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास बिलोलीचे पोलीस निरिक्षक अुल भोसले हे करीत आहेत.