नांदेड(प्रतिनिधी)-दरवर्षी साजरा होणारा ईद-ए-मिलादुन्न नबी या सणाची सुट्टी शासनाने बदलून 19 सप्टेंबर रोजी जारी केली आहे.ही सुट्टी फक्त मुंबईपुर्ती मर्यादीत आहे. सोबतच नांदेड मध्ये दरवर्षीय निघणारी मिरवणूक सुध्दा 16 सप्टेंबर ऐवजी 19 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे मिलाद कमिटीचे सदस्य मौलाना अझीम रिझवी यांनी जाहीर केले आहे.
यंदा 17 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन कार्यक्रम आहे. तसेच 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा होतो. या सर्व पार्श्र्वभूमीवर राज्य शासनाने ईद-ए-मिलादुन्न नबीची सुट्टी 16 सप्टेंबर ऐवजी 19 सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. ही सुट्टी फक्त मुंबईपुर्ती मर्यादीत आहे. ईद-ए-मिलादुन्न नबीच्यादिवशी नांदेड शहरात एक भव्य मिरवणूक काढली जाते. ही मिरवणुक मिलाद कमिटी नांदेडच्यावतीने आयोजित होत असते. श्री गणेश विसर्जन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनच्या पार्श्र्वभूमीवर प्रशासनाला काही अडचण येवू नये म्हणून मिलाद कमिटीने 16 सप्टेंबर रोजी निघणारी मिरवणुक 19 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केले. ही मिरवणूक दरवर्षी सकाळी निजाम कॉलनी श्रीनगर येथून निघते आणि तिचे समापन मोहम्मद अली रोडवरील मैदानात होत असते.