न्यायालयावर शंका घेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचे खमके उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
मुंबई (प्रतिनिधी)-भारताचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदंत पुजा केली आणि त्या पुजेचा व्हिडीओ फोटो त्यांनीच व्हायरल केले. यानंतर गेली दोन दिवस यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्या चर्चांना लाखो लोकांनी पाहिले आहे आणि ऐकले आहे. पण आज न्यायमुर्ती चंद्रचुड यांचे सहकारी न्यायमुर्ती सुर्यकांत आणि न्यायमुर्ती भुयान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देऊन झालेल्या 48 तासातील चर्चा, विश्लेषणे चुकीचे असल्याचे दाखवले.
भारताचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या घरी बुधवार दि. 11 सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले होते आणि त्यांनी तेथे एकदंताची पुजा करत आरती केली. यावेळी त्यांनी पुर्णपणे महाराष्ट्रीय पेहराव परिधान केलेला होता. याबाबीची वाच्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरून केली. त्यात व्हिडीओ आणि फोटो आहेत.
यानंतर लगेच गोदी मिडीयाने हे सर्व बरोबर आहे. हे सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला. तर काही विरोधी मिडीयाने हे कसे चुकीचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच प्रमाणे या बाबीची चर्चा सार्वजनिक झाली. भारताचे सर न्यायाधीश चंद्रचुड आणि पंतप्रधान मोदी हे दोन्ही व्यक्ती संवैधानिक पदावर आहेत. त्यांना व्यक्तीश काही व्यक्त करता येत नाही. सुरूवात अशी झाली की, मोदींना बोलावले की, ते स्वत: गेले. याचा खुलासा अद्यापही झालेला नाही. सोबतच भारतातील न्याय प्रक्रियेवर आता अविश्र्वास होईल अशी चर्चा सुरू झाली. या बाबीला उत्तर देण्यासाठी गोदी मिडीयाने भारताचे एक माजी न्यायाधीश माजी राष्ट्रपती यांच्या इफ्तार पार्टीमध्ये गेले होते याचा उल्लेख फोटोसह केला. पण याला उत्तर देणाऱ्यांनी ही चुक आहे. परंतू ती माणसाची चुक आहे असा उल्लेख केला.
कोणी म्हणत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही जागी जातांना त्यांच्यासोबत कॅमेरे असतातच. भारताच्या सरन्यायाधीशांनी त्या कॅमेरेवाल्यांना कॅमेरे बंद करा असे म्हणायला हवे होते. परंतू पंतप्रधान आले अशावेळेस सरन्यायाधीश त्यांना म्हणु शकतात का? हा प्रश्न आहे. काही जण सांगतात मोदींचे हे नियोजन होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लक्षात ठेवूनच महाराष्ट्रीयन पेहराव करूनच ते आरतीसाठी गेले होते आणि त्याचा प्रचार सुध्दा त्यांनीच केला. सोबत असेही काही विश्लेषक सांगतात की, सर न्यायाधीशांना मोदींची ही योजना माहित नसेल. आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयावर शंका घेण्यास कारण आहे असे म्हटले जात होते. यासाठी काही मागील न्यायाधीशांचा उल्लेख सुध्दा विश्लेषकांनी केला आहे. ज्यातील काही न्यायाधीशांना खासदार करण्यात आले. एका न्यायाधीशांना राज्यपाल करण्यात आले.
परंतू या सर्व 48 तासातील चर्चेना खमके उत्तर देतांना न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांच्या न्यायालयातील सहकारी न्यायमुर्तींनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला आहे. आता न्यायालयांवर शंका घेण्यास काय कारण आहे. अरविंद केजरीवाल हे जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये राहावे, त्यांच्याविरुध्द सादर करण्यात आलेला पुरावा योग्य नाही असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने या अगोदरच ओढलेले आहेत आणि आज त्यांची झालेली जामीन हे सर्वोच्च न्यायालयावर शंका घेणाऱ्यांना चोख उत्तर आहे.
एप्रिल महिन्यात अशोक पांडेय या पत्रकाराने आपल्या युट्युब चॅनलवर 90 वर्षापुर्वीचा हुकूमशाह मुसोलिनी याची कथा सांगणारा एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्या कथेत अशोक पांडेय सांगतात त्याप्रमाणे बॅनीटो मुसोलिनी हा जर्मनीचा रहिवासी असतांना त्याने इंग्लंडन आणि जापानसाठी हेरगिरी करून जर्मनीला त्रासात आणले होते. त्याने संपुर्ण विरोधी पक्ष संपवून टाकण्यासाठी केलेले प्रयत्न पांडेय यांनी वर्णन केलेले आहेत. पत्रकारांना खरेदी करून किंवा त्यांचा खून करून त्यांनी पत्रकारांना आपलेसे केले. काही पत्रकार भितीमुळे बोललेच नाहीत. पण ज्यांनी हिम्मत दाखवली त्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले. अशा प्रकारचा हुकूमशाह आपल्याच खोटारड्या आलेखांमध्ये अडकतो आणि तो त्यावरच विश्र्वास करतो असा या व्हिडीओचा एकूण अर्थ आहे. 30 मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. ज्याला 5 एप्रिल 2024 पासून ते आजपर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे आणि लाखो लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आहे. का हा व्हिडीओ अशोक पांडेय यांनी ऐतिहासिक पृष्ठ भुमी दाखविण्यासाठी एप्रिल महिन्यातच प्रदर्शित केला होता. या बद्दल शोध किंवा तपास आम्हाला करता आला नाही. परंतू त्यावेळी भारतामध्ये 18 व्या लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या.

अशोक पांडेय यांच्या युटूबची लिंक आम्ही वाचकांसाठी जोडली आहे.

youtube.com/@TheCredibleHistory

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!