नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शेषराव मंगनाळे यांच्या शेतात असणाऱ्या महादेव मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी 9 सप्टेंबरच्या रात्री फोडली होती. याबाबत नायगाव पोलीसात तक्रार दिली असता नायगाव पोलीसांनी या घटनेतील तीन आरोपींना पकडून त्यांच्याकडून 15 हजार 350 रुपयांचा मुद्देमाज जप्त केला.
मांजरम येथील मंगनाळे यांच्या शेतात असणाऱ्या महादेव मंदिराची दानपेटी 9 सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली. ही माहिती 10 सप्टेंबर रोजी कळाल्यानंतर याबाबत सुभाष हावगीराव मंगनाळे(48) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 228/2024 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रकाश पंडीत हे करीत होते.
प्रकाश पंडीत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गावातीलच बाजीराव गोविंदराव शिंदे(32) यास ताब्यात घेवून त्याच्याकडून या घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर यामध्ये गोविंद विठ्ठल शिंदे (36) आणि शरद धनराज शिंदे (22) सर्व रा.मांजरम यांनी मिळून मंगनाळे यांच्या शेतातील महादेव मंदिराची फोडल्याची कबुली दिली. यातून त्यांनी 1260 रुपये किंतीच चांदीचे दागिणे व 14 हजार 90 रुपये रोख असा एकूण 15 हजार 350 रुपयांचा मुद्दमाल लंपास केला होता. पोलीसांनी सर्व माल हस्तगत केला आहे.
या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव यांनी पोलीस निरिक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरिक्षक प्रकाश पंडीत, भिमराव कदम,पोलीस अंमलदार गणपत पदे, बाबुराव चरकुलवार, साईनाथ सांगवीकर, बालाजी शिंदे, बालाजी बामणे यांचे कौतुक केले आहे.