नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी ऑपरेशन फ्लॅशऑऊट दरम्यान दुचाकीवर गुटखा घेवून जाणाऱ्या दोन युवकांना पकडले आहे. त्यांच्याकडून गुटखा आणि दुचाकी असा एकूण 1 लाख 25 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार 9 सप्टेंबर रोजी देगलूर पोलीसांनी उदगीरहुन देगलूरकडे येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.के.8957 ला थांबवून त्याची तपासणी केली असता त्यांच्या जवळील बॅगमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधी पान मसाला आणि गुटखा मिळून आला. त्यांची नावे मोहम्मद मुजम्मिल अब्दुले खालेक (28) व मोहम्मद नोमान अब्दुल बारी (19) रा.मन्यारगल्ली इतवारा नांदेड अशी आहेत. यांच्याकडे सापडलेला गुटखा आणि त्यांची दुचाकी असा 1 लाख 25 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी, पोलीस निरिक्षक मारोती मुंडे यांनी पोलीस उपनिरिक्षक नरहरी फड, पोलीस अंमलदार मरगेवाड, साबरा सगरोळीकर, सुधाकर मरदोडे, शिवाजी आडबे, वैजनाथ मोटर्गे, विशाल अटकोरे यांचे कौतुक केले आहे.