नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयाने आदेश दिल्यानंतर भाग्यनगर पोलीसांनी 3 जणांविरुध्द 10 लाख 25 हजार 925 रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गंगाधर विश्र्वनाथ देलमाडे रा.कुरूंदा ता.वसमत जि.हिंगोली यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार दि.5 सप्टेंबर 2014 ते 16 ऑक्टोबर 2015 दरम्यान तीन जणांनी व्याज लाभाचे आमिष दाखवून रायजिंग लाईफ इंटरप्राईझेस् प्रा.लि., श्रीनिवास अपार्टमेंट राजेशनगर या कंपनीत 10 लाख 25 हजार 925 रुपये गुंतवणूक करायला लावले. पुढे व्याज देण्यास टाळाटाळ केली आणि कार्यालय सुध्दा बंद केले. न्यायालयाच्या आदेशानंतर भाग्यनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 34 आणि गुंतवणुकदारांचे संरक्षण कायदा 1999 च्या कलम 3 आणि 4 नुसार गुन्हा क्रमांक 438/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक मस्के यांना देण्यात आला आहे.