नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावडे रेसिडेन्सी तरोडा(खु) या हॉटेलमध्ये छापा मारून पोलीसंानी 22 हजार 590 रुपये रोख रक्कम आणि एक कार, एक ऍटो, पाच दुचाकी असा सर्व मिळून 10 लाख 62 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 9 जुगाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात चार पकडले गेले आहेत आणि पाच फारार झाले आहेत.
भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार शिवरोड जवळील पावडे रेसिडेन्सी तरोडा(खु) हारजित(अंदर बाहर) नावाचा जुगार सुरू आहे. पोलीसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. तेथे रवि शिवाजी कल्याणकर(24) अभिनव मिलिंद वाघमारे(29), राष्ट्रपाल पांडूरंग चव्हाण(25), माधव विठ्ठल जाधव(25) यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेले पाच पोलीस पथकाला छकवून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांची नावे ईश्र्वर शिवाजी जाधव, गौरख गडमे, प्रभाकर वाघमारे, राजू पाटील बोंढारर, शेख सलमा गोरठेकर असे आहेत. पोलीसांनी पकडलेल्या चार जुगाऱ्यांकडून 22 हजार 590 रुपये रोख रक्कम, एक कार, एक ऍटो, पाच दुचाकी गाड्या असा एकूण 10 हजार 62 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या 9 लोकांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 1887 च्या कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा क्रमांक 441/2024 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम.आदींनी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे, पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कळके, गजानन किडे, ओमप्रकाश कवडे, मारोती मुसळे, नवनाथ गुटे, सुर्यभान हासे, यांचे या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.