सोयाबिनच्या शेतात पक्षी थांबे उभारण्याचे कृषी विभागाचे आवाहन

विविध कीड आणि रोग नियंत्रण उपाययोजना

नांदेड  –   शेतकऱ्यांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. तसेच विविध किड आणि रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार विविध उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

विविध कीड आणि रोग नियंत्रणाबाबत उपाययोजना

तूर पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 5 टक्के निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 15 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तूर पिकात शेंगा पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे 50 मीटर अंतरावर शेतात उभारावेत. सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी 5 स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत.मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरानट्रानीली प्रोल १८.५ टक्के एस. सी ०.४ मिली प्रती लीटर पाणी किंवा स्पीनोटोराम ११.७ टक्के एससी ०.५ मिली प्रती लीटर पाणी किंवा इमामेक्टिनबेन्झोएट ५ टक्के एसजी ०.४ ग्राम प्रती लीटर पाणी वापरून फवारणी करावी. भुईमूग पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी फ्लुबेन्डामाइड ३.५ टक्के + हेक्साकोनॅझोल ५ टक्के डब्ल्यूजी २५ ग्रॅमप्रति १० लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी. भात पिकावर काही ठिकाणी तपकिरी तुडतुडे आणि हिरवे तुडतुडे याकिडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच फिप्रोनिल ५ टक्के एस.सी. २० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!