किनवट पोलीसांनी 13 लाख 40 हजारांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)- किनवट पोलीसांनी आज 6 सप्टेंबर रोजी बसस्थानकाजवळ एका चार चाकी वाहनाला पकडून त्यातील 13 लाख 38 हजार रुपयांचा सरकारने प्रतिबंधीत केलेला गुटखा प्रतिबंधीत केला आहे.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज किनवट पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी बसस्थानक किनवट येथे एम.एच.26 सी.एच.1443 ही चार चाकी गाडी थांबवली. त्यात शेख वसीम शेख रजाक रा.हिमायतनगर हा व्यक्ती होता आणि त्या वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 13 लाख 38 हजारांचा गुटखा होता.
पोलीस उपनिरिक्षक चॉंद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेख वसीम शेख रजाक विरुध्द भारतीय न्याय संहिता, अन्न व सुरक्षा मानके कायदाप्रमाणे गुन्हा क्रमांक 272/2024 दाखल करण्यात आला आहे. 13 लाख 38 हजार रुपयांचा गुटखा आणि 7 लाख रुपयांचे वाहन असा 20 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, किनवटचे पोलीस उपअधिक्षक रामकृष्ण मळघने यांनी किनवटचे पोलीस निरिक्षक सुनिल बिर्ला, पोलीस उपनिरिक्षक चॉंद, पोलीस अंमलदार कुडमेथे, गृहरक्षक दलाचे जवान श्रीमनवार, राठोड, उपलेंचवार, एडके, शेख यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!