साईनगर, इतवारा येथे 4 लाख 50 हजारांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरात छापा मारुन पोलीसांनी 4 लाख 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा पकडला आहे.
3 सप्टेंबर रोजी पोलीसांनी साईनगर भागातील वासेक शमीम सिद्दीकी मुसद्दीक मोहियोद्दीन सिद्दीकी(40) यांच्या घरात छापा टाकला. तेथे शासनाने प्रतिबंधीत केलेले सुंगधीत तंखाबु जर्दाचे 18 पोते, प्रत्येक पोत्यामध्ये 50 पुडे, एका पुड्याची किंमत 500 रुपये असे एकूण 900 पुडे ज्यांची एकूण किंमत 4 लाख 50 हजार रुपये आहे असा बेकायदेशीर साठा जप्त केला. या प्रकरणी पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 332/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड हे करीत आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात इतवाराचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, दासरे, समिर, गायकवाड, जावेद, आदे, हबीब चाऊस, मोहन हाके यांच्या कौतुक केले आहे.
जळपास 20 दिवांपासून पोलीसांनी अनेक अवैध धंद्यांविरुध्द नायनाट मोहिम उघडली आहे. परंतू आजही अनेक अशा जागा आहेत ज्या ठिकाणी पोलीस पोहचलेली नाही. अवैध धंदे करणाऱ्यांनी सुध्दा काम करण्याची पध्दत बदलेली आहे. अनेक जागा बदलल्या आहेत. काही राजकीय व्यक्ती सुध्दा या अवैध धंद्यांमध्ये गुंतलेले आहेत. पण त्यांचा माग आजपर्यंत कधीच लागलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!