विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून भाग्यनगर पोलीसांनी 12 तासात चोरीचा ऐवज जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालकाला पकडून भाग्यनगर पोलीसांनी त्याच्या ताब्यात चोरी केलेले सोन्याचे दोन पेंडल, 16 सोन्याचे मनी, एक सोन्याची चैन आणि एक घडी यासह दोन महागडे मोबाईल जप्त केले आहेत.
जनसंपर्क विभाग पोलीस अधिक्षक कार्यालयाने यांनी दिलेल्या प्रेसनोटनुसार 29 ऑगस्ट रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक चोरीचा प्रकार घडला. त्याबाबत गुन्हा क्रमांक 421/2024 दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना भाग्यनगर येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक के.बी.केजगिर, पोलीस अंमलदार विशाल माळवे, गजानन किडे, हनवता कदम आणि अदनान पठाण यांनी ए.के.संभाजी मंगल कार्यालयाजवळ 30 ऑगस्ट रोजी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून गुन्हा क्रमांक 421 मधील चोरी गेलेला ऐवज जप्त केला आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम. आदींनी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे यांनी त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी आणि लीस अंमलदारांचे तुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!