नांदेड,(प्रतिनिधी)-काल रात्री मुसळधार पाऊस झाला. वेध शाळेच्या अंदाजानुसार आज सुध्दा मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवस श्री शिवमहापुरण कथास्थळी भाविकांनी न येता ऑनलाईनवर या कथेचा श्रवण लाभ घ्यावा असे आवाहन कथावाचक पंडीत प्रदीपजी मिश्रा, जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि आयोजन शिवराज नांदेडकर आणि प्रशांत पातेवार यांनी केले आहे.
दि.23 ऑगस्टपासून जागतिक स्थळावरील कथावाचक पंडीत प्रदीपजी मिश्रा यांचे श्री महाशिवपुराण कथावाचन नांदेडमध्ये 29 ऑगस्टपर्यंत सुरू झाले होते. परंतू दि.23 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कथा सुरू आहे. त्या मंडपात पुर्ण पाणी भरले. बाहेरगावहून आलेले अनेक भाविक त्या मंडपातच थांबणार होते. परंतू पाणी भरल्याने त्यांची तारांबळ झाली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ यांनी आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना अडकलेल्या भाविकांच्या मदतीसाठी उभ केले. रात्री 12 वाजेपर्यंत मंडपात थांबलेल्या अनेक भाविकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले.
आजपासून पुढील दोन-तीन दिवस कथा मंडपात भाविकांनी येवू नये. ज्या-ज्या ठिकाणी भाविकांना थांबविले आहे तेथे ऑनलाईन स्क्रिनची सोय करण्यात आली आहे. सोबतच नांदेडकरांनी आपल्या घरी टी.व्ही.वर ही लाईव्ह कथा श्रवण करावी असे आवाहन कथावाचक पंडीत प्रदीपजी मिश्रा, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे. नांदेडमधील अनेकांनी भाविकांच्या थांबवलेल्या जागांवर जेवणाची, राहण्याची सोय केली आहे. काही भाविक आपल्या पथकातून वेगळे झाले आहेत. नांदेडकरांनी त्यांची मदत करून पुन्हा त्यांच्या गटात पोहचविण्यासाठी मदत करावी अशी विनंती वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने करण्यात येत आहे.