बिलोली पोलीसांनी 1 लाख 40 हजारांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी गस्त करत असतांना 18 ऑगस्ट रोजी बिलोली ते कुंडलवाडी जाणाऱ्या रस्त्यावरील एका पानशॉपवर छापा मारुन तेथून 1 लाख 38 हजार 990 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार 18 ऑगस्ट रोजी बिलोलीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर शिंदे, पोलीस उपनिरिक्षक दिलीप मुंडे, पोलीस अंमलदार मारोती मुद्देमवार, धोंडगे, जळकोटे, विद्यमवार, महिला पोलीस अंमलदार सोळंके, गृहरक्षक दलाचे जवान एडके आणि भालेराव हे बिलोली शहरात गस्त करत असतांना बिलोली शहरातील कुंडलवाडी रस्त्यावर त्यांनी नासेर पान शॉपवर तपासणी केली असतांना तेथे शासनाने बंदी आणलेले गुटख्याचे अनेक पुडे त्याच्या घराच्या ओसरीत ठेवलेले होते. पोलीसांनी या गुटख्याची मोजणी केली असतांना हा गुटखा 1 लाख 38 हजार 990 रुपये किंमतीचा आहे. पानपट्टी चालक अब्दुल नासेर अब्दुल रज्जाक याच्याविरुध्द अन्न सुरक्षा मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा क्रमांक 203/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, .खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांनी बिलोली पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!