परभणी पोलीस अधिक्षकांनी तयार केले चार ई.डी.पथक?

नांदेड(प्रतिनिधी)-स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या लेखी पत्रानंतर परभणीचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आपल्या जिल्ह्यात चार पथकांची निर्मिती केली असून आता त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अवैध धंदा चालणार नाही आणि अवैध व्यवसायांचे समुळ उचाटन करावे अशी जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. अर्थात पोलीस अधिक्षक परभणी यांनी चार ई.डी. पथक तयार केले आहेत. आज या ई.डी. पथकांचे देशभरात नाव गाजते आहे. बिहारचे प्रसिध्द पत्रकार अभिषेककुमार यांनी काही दिवसांपुर्वी एका वृत्ताच्या विश्लेषणात सांगितले होते की, बिहारमध्ये एक म्हण आहे. “मास की पोटली का गिध्द रखवालदार’ या पथकांचे असे होवू नये म्हणजे झाले. इतर तिन जणांमध्ये काय परिस्थिती आहे याची माहिती प्राप्त झाली नाही.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात नव्याने हजर झालेले पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे 2 ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांनी उपस्थितीत पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय 15 ऑगस्ट 2024 परयंत पुर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले. तरी पण जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून भरीव कामगिरी होत नसल्याने नाराजी व्यक्त करत शहाजी उमाप यांनी अर्थशासकीय पत्र जारी केले. त्याचा जावक क्रमांक पो.उप.म.नि./ वाचक/ अवैध व्यवसाय मोहिम/ 2024/151 दिनांक 14 ऑगस्ट 2024 असा आहे.
या पत्रानंतर परभणीचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आपल्या कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर जारी केलेल्या विशेष पोलीस पथक आदेशाचा आदेश जारी केला. त्याचा जावक क्रमांक 2632/ वाचक / विशेष पथक/2024/ परभणी दि. 15 ऑगस्ट 2024 असा आहे. या पत्रात स्थानिक गुन्हे शाखा परभणीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती आणि तीन पोलीस अंमलदार यांचे एक पथक तसेच स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक चंदनसिंह परीहार आणि त्यांच्यासोबत तीन पोलीस अंमलदार असे पथक.सायबर सेल विभागातील सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.एन.चन्ना आणि त्यांच्यासोबत तीन पोलीस अंमलदार तसेच जिल्हा विशेष शाखा परभणी येथील कपील शेळके आणि त्यांच्यासोबत तीन पोलीस अंमलदार अशी चार पथके तयार केली आहेत. मोटार वाहन विभागाला या चारही पथकांना चार सुस्थितीतील वाहने पुरविण्यास सांगितले आहे.
या संदर्भाने रविंद्रसिंह परदेशी यांनी जारी केलेल्या पत्रानुसार परभणी जिल्ह्यामतील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार, पोलीस निक्षिक, स्थानिक गुन्हे शाख यांनी अवैध धंद्यांची अत्यंत गोपनीय माहिती काढून जास्तीत जास्त कार्यवाही करून अवैध व्यसायांचे समुळ उच्चाटन करावे. जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपमहानिरिक्षक कार्याल्याकडून काही कार्यवाही झाल्यास सबंधंीत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हा शाखा यांना जबाबदार धरण्यात येईल असे पत्रात नमुद आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरिक्षक तसेच पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी अवैध व्यवसाय नेस्तनाबुत करण्यासाठी आपल्यास्तरावर विशेष मोहिम राबवावी. अवैध धंद्यांकडे डोळेझाक करणारे, त्यांना थारा देणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यावरही कठोर कार्यवाही करण्यात येईल असे या पत्रात नमुद आहे.
बिहार येथील प्रसिध्द पत्रकार, विश्लेषक अभिषेककुमार यांनी काही दिवसांपुर्वीच एका वृत्ताचे विश्लेषण करतांना बिहारमधील एक म्हण सांगितली होती. “मास की पोटली का गिध्द रखवालदार’ ही म्हण त्यांनी भारताच्या ईडी विभागाच्या संदर्भाने उल्लेखीत केली होती. परभणी पोलीस अधिक्षकांनी तयार केलेली ही चार पथके र्थात चार ई.डी. अभिषेककुमारच्या शब्दानुसार खऱ्या ठरू नयेत तरच कमावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!