उमरीतील एक घरफोडून चोरट्यांनी 7 लाख 80 हजारांचा ऐवज चोरला

नांदेड(प्रतिनिधी)-उमरी येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 7 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
आदेश विपुल जैन हे 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आपल्या घरास कुलूप लावून चाळीसगाव जि.जळगाव येथे आपल्या आपल्या बहिणीच्या गावी गेले. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ते परत आले तेंव्हा घराच्या मुख्य द्वाराचे कुलूप कटरने तोडलेले दिसले. घरातील गणपतीचे पेंडॉल असलेली चोन्याची चैन, हातीतील सोन्याच्या चार बांगड्या, दोन मंगळसुत्र, चांदीचा दहा ग्रॅम वजनाचा सिका, 25 तोळे वजनाचे चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम 30 हजार तसेच दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.एम.7566 चोरट्यांनी चोरून नेले आहे. चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांचे एकूण वजन 14 तोळे होत आहे. या प्रकरणातील चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत 30 हजार रुपये आहे. असा चोरट्यांनी एकाच घरातून 7 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(3), 331(4), 305(अ), 303(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 283/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक एस.एम.आरमाळ हे करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!