नांदेड(प्रतिनिधी)-राजकारणात वैचारिक मतभेद असतात पण एकमेकांची मैत्री जपावी लागते, सहकाऱ्याची भावना ठेवावी लागते. दुपारनंतर सावली मोठी दिसते आणि रात्री तिच सावली अदृश्य होते. याचप्रमाणे नाना पटोले हे कधी अदृश्य होतील हे सांगता येत नाही. त्यांना अजून मोठी वैचारिक पातळी गाठायची आहे. मी व्यक्तीगत कधी कोणावर द्वेष ठेवून बोललो नाही. राजकारणात वैचारिक मतभेद असतात आणि ते असले पाहिजेत असे म्हणत खा.अशोक चव्हाण यांनी कॉंगे्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टिका केली.
दि.11 सप्टेंबर रोजी कॉंगे्रस पक्षाच्यावतीने नांदेड शहरात विभागीय कार्यकर्त्यांची आढावा बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीला कॉंगे्रस पक्षातील अनेक वरिष्ठ मंडळी सहभागी झाली. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार यांच्यासह अनेक कॉंगे्रस पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी नांदेडमध्ये काल दाखल झाले होते. यावेळी प्रत्येकाने द्वेष भावनेतूनच व व्यक्तीगत पातळीवर जाऊन टिका-टिपणी केली. कार्यक्रम संघटनात्मक बांधणी आणि विधानसभेची रंगीत तालीम असा होता. पण या ठिकाणी अनेकांनी व्यक्तीगत पातळीवर जाऊन टिका-टिपणी केली हे दुर्देव आहे. राज्यामध्ये महायुती सरकारने लाडकी बहिण ही योजना आणली. सध्या राज्यात ही योजना लोकप्रिय ठरत असतांनाच याच बरोबर 11 ते 12 योजनाा महत्वाच्या राज्य शासनाने आणल्या. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू आता घसरत आहे. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत नकारात्मकता पुढे आणून मते मिळविण्याचा प्रकार सुरू केला जात आहे. विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला सावत्र आईची वागणुक दिली जात आहे असे खा.अशोक चव्हाण यांनी आरोप केला.
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार आहेत. मुस्लम धोक्यात आहेत असे म्हणून निगेटीव्ह वातावरण पसविण्यात आल आणि यामुळेच कॉंगे्रसची लॉटरी लागली. पण जनतेला नेहमी तुम्ही मुर्ख बनवू शकत नाही. असेही ते म्हणाले. खा.अशोक चव्हाण यांच्यावर टिका केल्याशिवाय नाना पटोले यांचे राजकारण होत नाही. मी कॉंग्रेस पक्षात असतांना ते बंद खोलीमध्ये माझ्याविषयी बोलत होते पण आता ते उघडपणे बोलत आहेत. नाना यांच्या स्पर्धेत जे-जे नेते आहेत. त्यांच्याबद्दल ते नेहमी लुज टॉकींग करतात. त्यांची ती सवयच आहे. कॉंगे्रस पक्षातून जे काही लोक बाजूला गेले. ते केवळ गट-तटाच्या राजकारणामुळे, कॉंगे्रस पक्षातील चांगली लोक बाजूला गेले. काही जणांनी पक्षांतर केले तर काही जण घरी बसले असेही अशोक चव्हाण म्हणाले.