नांदेड(प्रतिनिधी)-शुक्रवारच्या बाजारातून राधाच्या हरवलेल्या संस्कृतीला शिवाजीनगर पोलीसांनी तिच्या आईकडे परत दिले तेंव्हा पावसात आपल्या बालिकेला शोधत फिरणारी राधा पावसाने भिजली होती. पण आपल्याला आपली मुलगी परत देणाऱ्या पोलीसांचे राधेने तोंडभरून कौतुक केले. पोलीस ठाण्यात या बालिकेच्या मस्तकावरुन मायेचा हात फिरवतांना पोलीस निरिक्षक जालिंधर तांदळे यांची अवस्था अत्यंत बिकटच झाली होती.
प्रत्येक आठवड्याप्रमाणे आज शुक्रवारी अण्णाभाऊ साठे चौक ते विसावा गार्डन डावीकडे गोकुळनगर आणि मुख्य रस्त्यावर शिवाजीनगरपर्यंत तसेच आनंदनगर भागातील रस्त्यावर हा भाजीपाला बाजार भरतो. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास या बाजारात एक 5 वर्षाची बालिका रडतांना दिसली. गस्ती पथकातील पोलीसांचे पथक तिच्याकडे गेले. पोलीसांनी त्या बालिकेला सोबत आणून पोलीस निरिक्षक जालिंधर तांदळे यांना या बाबतची माहिती दिली. जालिंधर तांदळे यांनी त्या बालिकेला आपल्याजवळ बोलावून तिच्या तोंडावरून आणि डोक्यावरून मायेचा हात फिरवत विचारणा केली बेटा तु सांगशिल त्या ठिकाणी आम्ही घेवून जाऊ, तु ्या ई-वडीलांनाा ओळखशील काय? या बालिकेला रडू आले. यावेळी जालिंधर तांदळे यांच्या सैनिक मन असतांना सुध्दा त्यांचे हृदय जड झाले. त्यांनी बालिकेला केलेल्या विचारणेनुसार ती आपले नाव सांगत होती आणि गावचे नाव निमगाव असे सांगत होती. जालिंधर तांदळे यांनी त्वरीत आपल्या पोलीसांना आदेश दिला की, पोलीस गणवेश न परिधान केलेल्या महिला साध्या ड्रेसमध्ये असेल तर तिला बोलवा. पण त्या ठिकाणी हजर असलेल्या महिला पोलीस मंगला भोसले यांनी सांगितले सर मी या बालिकेला सांभळते. त्वरीत प्रभावाने त्या रडणाऱ्या बालिकेचा लाड करत पोलीसांनी तिच्यासाठी खाण्याची काही वस्तु आणली.
त्यानंतर जालिंधर तांदळे यांनी पोलीसांना सांगितले की, आपल्या ज्या गाडीवर ध्वनीक्षेप आहे ती गाडी घेवून जा आणि या बालिकेच्या आई-वडीलांना शोधा तेंव्हा महिला पोलीस मंगला भोसले, पोलीस अंमलदार शेख गफार शेख ईस्माईल, देवसिंग सिंगल आणि चालक गृहरक्षक दलाचा जवान अरविंद टिंगरे यांनी त्या बालिकेला सोबत घेवून ज्या ठिकाणी ती बालिका सापडली होती. तेथे नेले. त्या ठिकाणी त्यांनी ध्वनीक्षेपकातून संस्कृती रतन मोरे ही पाच वर्षाची मुलगी आमच्या ताब्यात आहे. ज्यांची आहे त्यांनी या आणि तिला घेवून जा. पोलीसांच्या या मेहनतीला त्या ठिकाणी भाजी विक्रीसाठी आलेल्या एका वयस्कर महिलेने प्रतिसाद दिला आणि त्या बालिकेच्या आजीचे नाव पोलीसांना सांगितले. छोट्याशा धाग्यावरून मोठ-मोठ्या गुन्ह्याची उकल करणाऱ्या पोलीसांनी सांस्कृतीचे वडील यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. रतन, संस्कृती आणि संस्कृतीची आई राधा हे सर्व लिंबगावचे रहिवासी आहेत. रतनला फोन लावल्यावर मी भाजी कोणाच्या भरवशावर सोडून येवू असे न पटणारे उत्तर दिले. पण जालिंधर तांदळे यांच्या सैनिकांनी संस्कृतीच्या आईचा शोध घेतला. ती आनंदनगर रस्त्यावर भाजी विक्री करत होती. पोलीस जेंव्हा तिला भेटले तेंव्हा ती राधा पुर्णपणे पाण्याने भिजली होती. आपल्या बालिकेला शोधत ती हिंडत होती. पण पोलीसांनी तिची बालिका परत दिल्यावर तिचा आनंद गगणात मावेनासा झाला. पोलीसांचे हात जोडून धन्यवाद व्यक्त करतांना राधाचाही कंठ भरून आला होता.
आपले दैनंदिन काम सोडून एका रडत्या बालिकेवर लक्ष ठेवून तिच्या आई-वडीलांचा शोध घेवून ती बालिका आई-वडीलांच्या स्वाधीन करणाऱ्या शिवाजीनगर पोलीसांचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे दोन भाऊ आणि एक बहिण अशी तिन आपत्य राधा आणि रतनच्या संसारात आहेत.