आपल्या जिवनाचे मार्गक्रमण करतांना आपल्याला अनेक त्रासांना सामोरे जावेच लागते आणि ते त्रास आपल्या जीवनातील ध्येयाकडे नेण्यासाठी आपल्याला प्रेरक ठरतात. अशाच एका जालिंधरला शुभकामना देतांना आम्ही खुप छोटेसे व्यक्ती आहोत ज्याच्यावर अनेक जण प्रेम करतात, जो शुर आहे तसेच त्यांच्या नावाप्रमाणे भगवान शिवाचे रुप मानले गेले अशा जालिंधरला शुभकामना देतांना आम्हाला आनंदच होत आहे.
नांदेड शहराच्या पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे जालिंधर आनंदा तांदळे हे पोलीस निरिक्षक कार्यरत आहेत. वाटेगाव ता.वाळवी जि.सांगली अर्थात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्म गाव येथे त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1967 रोजी झाला. त्यांच्या आई नानुबाई आणि वडील आनंदा यांच्या संसारात तीन लेकरे आली. त्यात जालिंधर यांचा दुसरा क्रमांक आहे. प्राथमिक शिक्षण वाटेगाव येथे पुर्ण करून कासेगाव ता.वाळवा येथे त्यांनी माध्यमामिक व हायस्कुल शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर इस्लामपूर येथे उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांना भारतीय नौदलाने आपल्या सेवेत जागा दिली. सी सिकींग, 42 ए, अल्फा, ब्रावो अशा अनेक हेलिकॉप्टरांच्या मोहिमेत त्यांनी आपला सहभाग नोंदविला. मालदिव येथील 1988-1989 मध्ये झालेल्या ऑपरेशनमध्ये त्यांनी सहभाग घेतला. आयएनएस गोदावरी तेथे गेले होते. त्याला सुरक्षा दिली. ऑस्ट्रेलियन नौदल स्थापनेच्या द्विशताब्दीनिमित्त ऑस्टेलिया आणि मलेशिया या देशात भारताचे प्रतिनिधीत्व केले. दरम्यान 1994 मध्ये त्यांचे लग्न कासेगाव येथील सुनिता यांच्यासोबत झाले. या दोघांनी आपल्या जीवनात तुषार आणि तन्वी या दोन आपत्यांना जन्म दिला.
झेलम-चिनाब आणि सिंधु या तिन नद्यांच्या तळभागाला सुध्दा जालिंधर म्हणतात. पाण्याखाली असणारी भुमि ती जागा सुध्दा जालिंधर या नावाने ओळखल जाते. ज्या नवनाथांनी जगाला शिकवण दिली त्या नवनाथांमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या नाथांचे नाव सुध्दा जालिंधर नाथ आहे. आपल्या आई-वडीलांच्या आशिर्वादाने नौदलात काम करत असतांना 1997 मध्ये त्यांच्यावर ओढावलेला दुर्देवी प्रसंग एवढा भयंकर होता की, जीवनच आता शेवट या मार्गावर जाईल असे झाले. परंतू त्या प्रसंगाला अत्यंत दमदारपणे प्रतिसाद देत आपल्या जीवनात, आपल्या कुटूंबात कोणता ही बदला घेण्याची भावना येणार नाही याची जाण राखून जालिंधर तांदळे यांनी डोळ्यातील अश्रु लपवत ओठांवर हसू आणले आणि जीवनाच्या प्रवासाला नव्याने सुरूवात केली. विचारवंत म्हणतात ना जीवनात काही बनायचे असेल तर आपण विनम्रता शिकली पाहिजे. कारण एक छोटेसे बी जमिनीत दबते, तेव्हाच ते झाड बनत असते. अशाच पध्दतीने त्यांनी आपले वागणे ठेवले. आपल्या अंर्तमनात कितीही संघर्ष असला तरी आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय त्यावेळी जालिंधर तांदळे यांनी केला आणि तो वाखणण्यासारखा आहे.त्यानंतर 1 जानेवारी 2002 रोजी भारतीय नौदलातून परत आले आणि त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामाच्या माध्यमातून पोलीस उपनिरिक्षक पद प्राप्त केले. 2007 मध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक पोलीस म्हणून पुणे शहरात आपल्या पोलीस जीवनाची सुरूवात केली. पुढे पोलीस ठाणे निगडी पुणे, पुणे शहर गुन्हे शाखा असे काम करत सन 2012 मध्ये त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक पद प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी सन 2014 मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे आणि पुढे सन 2018 मध्ये नागपूर शहरात काम केले. पुढे पोलीस निरिक्षक पदोन्नती प्राप्त करून त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात सेवा दिल्या. त्यानंतर 2024 मध्ये ते नांदेड जिल्ह्यात आले. म्हणतात ना योगेश्र्वर काही न सांगताच सर्व काही ओळखतात. तेंव्हा त्यांनी जालिंधर तांदळे यांना पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे जबाबदारी दिली.
पुण्यामध्ये पोलीस उपनिरिक्षक झाल्यावर त्यांच्या पत्नीच्या मावशीच्या मुलीसोबत प्रियंका कडू नावाची 20 वर्षीय युवती त्यांच्या घरी येत राहिली. ती युवती आश्रमात राहत होती. जालिंधर आणि सुनिता यांचे वागणे प्रियंकाला आवडे आणि प्रियंकाने एका दिवशी या दोघांना आपले आई-वडिल होण्याची विनंती केली. आई-वडील होण्यात कायदेशीर बाबी असतात परंतू या दोघांना प्रियंकाचे पालकत्व स्विकारले. त्यानंतर प्रियंका त्यांच्याच घरी राहु लागली आणि आपल्याच बॅंकेत काम करणाऱ्या आनंद ठाकूर या बिहारी युवकाशी लग्न करण्याची मानसिकता दाखवली. त्यानंतर जालिंधर आणि सुनिता बिहार येथे आनंद ठाकूर यांच्या घरी गेले. तेथील सर्व तपासणी करून जालिंधर तांदळे यांनी प्रियंका कडूचे लग्न आनंद ठाकूर यांच्याशी लावून दिल. आज आनंद ठाकूर हे दिल्लीमध्ये व्यवसाय करतात आणि प्रियंका ही बॅंकेत काम करते.
दुसऱ्या एका प्रकरणात सन 2011 मध्येच असा एक प्रकार घडला की, सुनिता यांच्या बंधूची पत्नी वारली आणि त्यावेळी त्यांची 6 महिने वयाची वैष्णवी नावाची बालिका सुनिताने आपल्या कडेवर घेतली तर ती कायमचीच त्यांच्याकडे राहिली. आजही वैष्णवी आपल्या वडीलांना मामा म्हणते आणि जालिंधर आणि सुनिता यांना आई-वडील असे संबोधीत करते. वैष्णवी सध्या शिक्षण घेत आहे आणि सुनिता आणि जालिंधर यांच्या पालकत्वात आपल्या जीवनाचा नवीन ध्येय मार्ग चालत होता. आपल्या दोन पाल्यांना जगवितांना एक 20 वर्षाची युवती आणि एक 6 महिन्याची बालिका अशा दोन अतिरिक्त पाल्यांचे पालकत्व स्विकारून जालिंधर तांदळे आणि त्यांच्या सुनिता यांनी मोठा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.
आपल्या पोलीस जीवनात बक्षीस संख्या त्यांच्याकडे 150 पेक्षा जास्त आहे.पण त्यातही कमतरता वाटते, कारण बक्षीस संख्येचा आलेख वाढविण्याची एक कला आहे आणि ती कला बहुतेक जालिंधर यांना आली नाही. परंतू आपल्या जीवनातील आपण केलेल्या कामांवर त्यांना भरपूर समाधान आहे. आपल्या कामातील एक प्रसंग सांगतांना त्यांनी सांगितले की, एक 64 वर्षीय व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलीचा खून केला आणि गायब झाला. या प्रकरणाचा तपास करतांना त्यांनी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील शिर्डी, नाशिक, नृसिंहपुर येथे चक्रा मारल्या. पण तो खूनी व्यक्ती भोपाळमध्ये बाबा बनुन बसला होता. एका आश्रमातून त्याला अटक करून पुन्हा पुण्याला आणले आणि त्याच्याविरुध्द दोषारोप सादर केला. जालिंधर तांदळे यांनी आपल्या जीवनात अनेक गुन्हेगारांना गुन्हेगारी सोडवून छोटे-मोठे कामे करायला लावले आहेत. त्याचाही प्रभाव त्यांच्या वागण्यात दिसतो. गुन्हेगार घडतात पण ते कामच गुन्हेगार राहत नसतात. पोलीस म्हणून माझी सुध्दा जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीला अनुसरून मी माझे काम करत असतांना त्यांना चांगल्या वळणावर आणले. जीवनात संयम महत्वाचा आहे. कारण एखाद्या घटनेनंतर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार केला तर आपण आपले भविष्य चांगले घडविण्यासाठी प्रयत्न करू शकतो असे जालिंधर तांदळे यांना वाटते. हे काम करत असतांना जालिंधर तांदळे यांनी लक्षात ठेवले की, मोडतोड करायला ज्ञान लागत नाही. परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपण लागते. प्रत्येकवेळी निष्कर्ष बरोबरच असतीलच असे नसतं. म्हणून गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्या समजून घेण्यातच तुमचं आणि समाजाच हित असतं हे जाणल होत. हे करत असतांना प्रत्येक गोष्ट शब्दांतून व्यक्त करता आली असती तर श्वास, नजर आणि स्पर्श यांना किंमत राहिली नसती. जीवन सर्वांसाठी सारखच असत फरक फक्त एवढाच कोणी मनासारखं जगत असत तर कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असत असेच वागत जालिंधर तांदळे यांनी त्या गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.
जालिंदर तांदळे यांना कायद्याला अभिप्रेत असलेलीच कामे करायची आहेत असा वसा त्यांच्याकडे आहे. काही कामे करण्यास जालिंधर तांदळे यांनी नकार दिल्यानंतर त्या शब्दगुंडांनी जालिंधर तांदळे विरुध्द एक टेबल न्युज लिहिली आणि तिला वेगवेगळ्या सामाजिक संकेतस्थळांवर व्हायरल करून त्यांचा सुड घेण्याचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना आपल्या वागण्यात सत्यता आणि प्रामाणिकता असेल तर आपल्या मदतीला निसर्गसुध्दा उभार राहतो. याच शब्दांवर विश्र्वास करून जालिंधर तांदळे यांनी त्या प्रकरणातील फिर्यादीने दिलेल्या जबाबानंतर तो घटनाक्रम पुणे पोलीसांनी बंद केला आहे. ज्या माणसाकडे सत्य, पावित्र्य आणि नि:स्वार्थी वृत्ती या तीन गोष्टी असतील त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. या तीन गोष्टी असल्यावर अख्खे विश्व जरी तुमच्या विरोधात उभे राहिले तरी तुम्ही एकटे त्यांना सहज तोंड देऊ शकता याची जाणिव जालिंधर तांदळे यांना होती. योगेश्र्वराच्या छायेत 100 व्यक्ती 5 व्यक्तीचे काही करू शकले नाही तशीच योगेश्र्वरांची छत्रछाया जालिंधर तांदळेवर होती आणि त्यांचेही काही वाईट झाले नाही. उलट शब्द गुंडच तोंडघशी पडले.
जालिंधर तांदळे यांच्या आयुष्यात आलेला प्रत्येक अनुभव त्यांना काही तरी शिकवूण गेला. कधी तो अनुभव हसवून गेला, कधी तो अनुभव रडवून गेला, कधी तो अनुभव फसवून केला, कधी त्या अनुभवातून आपली माणसे परकी झाल्याची जाणिव त्यांना झाली. तसेच कधी परकी माणस आपलीच असल्याची जाणिव झाली. म्हणूनच म्हणतात ना आयुष्यात अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही. आयुष्यात सामर्थ्य निर्माण करायचे असेल तर पहिले स्वत:ला राजा समजण्याचा आवश्यकता आहे आणि असाच प्रकार आपल्या जीवनात जालिंधर तांदळे यांनी प्रत्यक्षात आणत सामर्थ्य निर्माण केले. कारण गुलामगिरीच्या विचार श्रेणीतून फक्त गुलामच तयार होता राजा नाही याची जाणिव तांदळे यांना होती. जालिंधर तांदळे यांनी आपल्या जीवनात विचार आणि वागणूकीला खुप महत्व दिले आहे. विचाराने वागणूक बदलते आणि वागणूकीने विचार बदलतात. काही विचारवंत सांगतात कल्पना सुंदर असते हो पण तिच्यासोबत जगता येत नाही आणि वास्तविकता कडू असते तिला आपल्याला सोडता येत नाही. आशा आणि विश्र्वास कधी चुकीचे नसतात परंतू ते आपल्याला ठरवायचे असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्र्वास कोणावर करायचा.आपल्या पुढच्या जीवनात आपण नक्कीच याच्यावर विचार करा. कारण लोक सोन्याला घासून बघतात, चंदनाला उगाळून लावतात, झिज ही खऱ्याचीच होत असते म्हणून खऱ्याला स्वत:चा खरे पणा आयुष्यभर सिध्दच करावा लागतो. आपल्याला सुध्दा ही सिध्दता जीवनात करावीच लागणार आहे. आपल्यातील साधे पणा हा आपल्यात असलेला जगातील सर्वात महाग दागिणा आहे. तो जोपासणे प्रत्येकाला परवडत नाही. बंधनात राहायला कोणाला आवडत नाही मग तो मुक्का प्राणी असो की माणसाचे विचार. आयुष्यात जगण समजल की, वागण बदलायला वेळ लागत नाही आणि आपल्यात ही कला आहे याची जाणिव आम्हाला आहे. भविष्याच्या जीवनात इतरांच्या सुखासाठी झिजून आपले जीवन आपण चालवावे हे आम्हाला सांगायचे आहे. कारण एखादी वस्तु न वापरता सुध्दा गंजते आणि जास्तच वापरली तर ती झिजते. काहीही झाल तरी शेवट ठरलेलाच आहे. मग कोणाच्या उपयोगात न येता गंजण्यापेक्षा आपण इतरांच्या सुखासाठी झिजावे अशी आपणास शुभकामना आहे.
आजच्या परिस्थितीत माझे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासोबत काम करतांना येत्या 10 महिन्यात माझा पोलीस सेवाकाळ पुर्ण होणार आहे याचाही मला एक विशेष आनंद आहे असे जालिंधर तांदळे यांना वाटते.
भाषा ही फक्त बोलण्यासाठी नसते, शब्द हे फक्त लिहिण्यासाठी नसतात त्यातील दमदार पणा माणसांना जोडत असतो आणि या प्रयत्नातून आम्ही एक नवीन मित्र जोडला आहे त्या मित्राला जन्मदिनी शुभकामना देतांना पोलीस दलात काम करतांना तुम्ही ज्या प्रमाणे गरीबांचे आश्रु पुसण्यासाठी स्वत:चे बाहुबल उदंड ठेवले त्याचप्रमाणे भविष्यात सुध्दा तुम्हाला हे करण्याची संधी लाभो अशी शुभकामना…