नांदेड(प्रतिनिधी)-संचित रजेवर कारागृहातून आलेला कैदी संचित रजेची वेळ संपल्यानंतर पुन्हा कारागृहात हजर झाला नाही. त्यास स्थानिक गुन्हा शाखेने पकडून पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात पाठविले आहे.
नांदेड जिल्ह्यातील जवळा मुराद ता.मुदखेड येथील दिनेश अर्जुनसिंह ठाकूर हा छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगात होता. कारागृह कायद्यानुसार काही दिवसांनी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित रजा(पॅरोल) मिळत असते. त्यानुसार दिनेश अर्जुनसिंह ठाकूर हा पॅरोल रजेवर बाहेर आला. परंतू पॅरोल रजेची मुदत संपल्यानंतर सुध्दा तो परत गेला नाही. स्थानिक गुन्हा शाखेने त्यास पकडले असून त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात केली आहे. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रुपेश दासरवाड, बालाजी यादगिरवाड, ज्वालासिंग बावरी, मारोती मोरे, हनुमानिह ठाकूर, शेख कली यांचे कौतुक केले आहे.