नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हा शाखेचे 18 पोलीस अंमलदार एकदाच बदलून योगेश्र्वराने आणलेली पध्दत कायम राहावी. यानंतर येणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या मुलाखती घेवून त्यांची सर्व प्रकारची चाचणी करूनच स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती द्यावी अशी अपेक्षा पोलीस दलातून व्यक्त होत आहे.
काही पोलीस अंमलदारांनी बऱ्याच वर्षापासून स्थानिक गुन्हा शाखेत ठाण मांडलेली होती. त्यामुळे त्यांचे वेगळे कुरण तयार झाले होते. आमच्याशिवाय स्थानिक गुन्हे शाखा चालूच शकत नाही असा काही पोलीस अंमलदारांचा गौड गैरसमज होता. पण या गौड गैरसमाजाला पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काटशह दिला आहे. पण बदलेल्या 18 मधील 5 जणांना पोलीस अधिक्षक कार्यालयातीलच दुसऱ्या विभागात पाठविले आहे. पोलीस अधिक्षकांनी नवीन पोलीस अंमलदार घेतांना त्यांची मुलाखत घ्यावी, त्यांच्या सर्व चाचण्या घ्याव्यात आणि मगच सक्षम पोलीस अंमलदारांना स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती द्यावी अशी अपेक्षा पोलीस दलातूनच व्यक्त होत आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतून बदलेले पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. गजानन किशन बैनवाड-नियंत्रण कक्ष, मोतीराम लिंगू पवार, तानाजी मारोती येळगे, रेशमा हबीब खान पठाण, देविदास धावजी चव्हाण, संभाजी अंबाजी मुंडे या पाच जणांना दहशतवाद विरोधी कक्षात स्थापना दिली आहे. बजरंग माणिकराव बोडके-पोलीस ठाणे इतवारा, रणधिरसिंह राजबन्सी, बालाजी गणपतराव मुंडे, अर्जुन दत्ता शिंदे -शहर वाहतुक शाखा वजिराबाद, राजू दिगंबर पुलेवार-डॉग हेन्डलर बीडीडीएस, पंचफुला शंकर फुलारी, जिल्हा विशेष शाखा, शंकर माणिक केंद्रे-श्वान पथक, दत्तात्रय किशनराव घुले-लोहा पोलीस ठाणे, हनुमानसिंह बलरामसिंह ठाकूर-शेख कलीम शेख करीम साब-शहर वाहतुक शाखा इतवारा, गुंडेराव रघुनाथ कर्ले-लिंबगाव पोलीस ठाणे, पिराजी लालु गायकवाड-नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे या सर्व पोलीस अंमलदारांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत.
तानाजी येळगेसाठी फक्त भिंत बदलली
काही दिवसांपुर्वीच अपर पोलीस महासंचालकांनी संलग्न या शब्दात कोणाचीही नियुक्ती होणार नाही असे आदेश जारी केले होते. तानाजी येळगेला 11 नंबरमधून काढून 9 नंबरमध्ये पाठविले आहे आणि त्याच्या नावासमोर रिंदा पथक असे लिहिले आहे. रिंदा पथक 9 नंबरमध्येच काम करते मग तानाजी येळगेची बदली झाली काय? हा प्रश्न समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यात 3400 पोलीसांमध्ये तो एकटाच आरोपी आणतो अशी ख्याती काही फालतू अधिकाऱ्यांनी त्याला दिली आहे. योगेश्र्वरांना सुध्दा विश्र्वास असेल की, हाच तानाजी येळगे आता सात वर्ष एलसीबीत काम केल्यानंतर रिंदाला आणेल. रिंदा संदर्भाने एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तीन वर्षापुर्वी सांगितले होते की, तो आमच्या कक्षेबाहेर आहे. म्हणजे तो तानाजीच्या कक्षेत असू शकतो.अज्ञांकित कक्षात तानाजी येळगेला सोनखेड पोलीस ठाण्यात पाठविले अशी खात्रीलायक माहिती होती. त्यानंतर रिंदा पथक हा बदल कसा झाला हा एक शोध विषय होवू शकतो. अज्ञांकित कक्षात तानाजी येळगेला सोनखेड पोलीस ठाण्यात पाठविले अशी खात्रीलायक माहिती होती. त्यानंतर रिंदा पथक हा बदल कसा झाला हा एक शोध विषय होवू शकतो.