नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील खाजगी संस्थेमध्ये कार्यरत असणार्या शिक्षकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यात सर्वात महत्वाचे वेळेवर होत नसलेले वेतन हा प्रामुख्याने मुद्दा असून प्लॅनच्या शिक्षकांचे नॉन प्लॅनमध्ये परावर्तीत करणे हा प्रामुख्याने मुद्दा आहे. या मुद्यासह सर्व सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन खाजगी शाळेतील शिक्षकांच्या शिष्टमंडळास माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी दिले. गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी शाळेतील शिक्षक काम करतात. परंतु त्यांना काम करून देखील शासन वेळेवर दाम देत नाही. ही वास्तविक शोकांतिका आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांवर उपासमारीची वेळ येत आहे. या शिक्षकांचे कोणी ऐकावयालाही तयार राहत नाही. परंतु गेल्या अनेक दशकांपासून शिक्षकांच्या प्रश्नी धावून येणारे नेते म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव प्रत्येक शिक्षकांच्या ओठावर असते. जेव्हा जेव्हा शिक्षक अडचणीत येतात. तेव्हा तेव्हा खा.अशोक चव्हाण यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर तोडका काढून तो मिटवला आहे. 15 ते 20 वर्ष सेवा करून देखील शिक्षकांना वेतनासाठी वाट पहावी लागते. ्या अनेक महिण्यांपासून अनेक शिक्षकांे वेतन झाले नाही. त्यामुळे खाजगी शाळेतील शिक्षक हे थेट माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भेटीला गेले. प्लॅन व नानप्लॅनचा विषयी त्यांच्या सोबत चर्चा केली. त्यावर खा.अशोकराव चव्हाण यांनी तात्काळ हा प्रश्न निकाली काढण्यात येईल. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर यांच्या सोबत लवकरच या प्रश्नी पाठपुरावा करु अशी ग्वाही देखील. खा.अशोकराव चव्हाण यांनी शिष्टमंडळास दिली. खाजगी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले. शिक्षकांचे व कर्मचार्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांची जाण असणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करील. असेही त्यांनी आश्वासीत केले. आता हा प्रश्न लवकरच सुटेल असा विश्वास शिक्षकांना वाटत आहे. या शिष्टमंडळात देविदास डांगे, धाराजी गुमणार, मन्मथ केसे, नितीन लाठकर यांच्यासह आदी शिक्षक उपस्थित होते.
More Related Articles

सारथी प्रणाली 18 मेपर्यंत बंद
नांदेड – अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्ती विषयक सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4. 0 या…

बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड :- येत्या शैक्षणिक वर्षात 2024-25 साठी आर्थीक सहाय्य योजनेसाठी महाराष्ट्रातील चुनखडी, डोलोमाईट, बिडी, खनिज…

नांदेड येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान संगीत शंकर दरबाराचे आयोजन
◆ शास्त्रीय गायन व वादनाचा कार्यक्रम ◆ संगीत दरबार महोत्सवाचे हे २१ वे वर्ष नांदेड- …