बिना दर्जा, क्षमता नसलेल्या मटेरियलने मनपाने नांदेड शहरातील काही खड्डे बुजवून दाखवले आपले काम

नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत कर्तव्यदक्ष महानगरपालिका प्रशासनाने बोटावर थुका लावून त्याची दिशा बदलण्याचा प्रकार करत शहरातील काही खड्‌ड्यांमध्ये सिमेंट आणि वाळू टाकून आम्ही किती त्वरीत काम करतो हे दाखविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला आहे.
यंदाच्या पावसाळ्याने महानगरपालिकेचे पितळ उघडे पडल्यानंतर अनेक संघटनांनी, जनतेतील नागरीकांनी, प्रसार माध्यमांनी त्यावर आसूड ओडले. या आसुडांना प्रतिसाद देत महानगरपालिकेने काही भागांमध्ये खड्‌ड्यांना वाळू, सिमेंट आणि गिट्टी टाकून बंद केले आहे. पण हा प्रकार अत्यंत थातूर मातूर असल्याचे दिसते.
आज सकाळी वास्तव न्युज लाईव्हच्या टिमने शहरातील जुना मोंढा भागात अशा विझवलेल्या खड्‌ड्यांचे छायाचित्र घेत असतांना आमची कृती पाहुन एक सिव्हिल इंजिनिअर आम्हाला पाहत असतांना म्हणाला हा बुजवलेला खड्डा संध्याकाळपर्यंत सुध्दा टिकणार नाही. कारण अभियंता सांगत होता. या खड्डयात भरलेले मटेरियल त्या खड्डपेक्षा खुप उंच झालेले आहे. तसेच दुर्दवाने आज पाऊस आला तर सर्व मटेरियल वाहुन जाईल. उलट ते वाहिलेले मटेरियल रस्त्यावर येवून इतरांना सुध्दा त्रास होईल.


या कामासाठी किती खर्च झाला असेल, का करून घेतले असेल हे काम, करायचे होते तर ते चांगलेच करायचे होते अशा शब्दात तो अभियंता आपले दु:ख व्यक्त करत होता. सन 2007 मध्ये जुना मोंढा टावर भागात लावलेल्या दगडांवर सुध्दा भरपूर अभियंत्यांनी आपले मत व्यक्त केले होते. पण तेथे दगडेच लागली आणि सन 2007 ते 2024 पर्यंत नांदेडकर जनता त्या दगडांवर उसळत होती आणि आता त्यात झालेले खड्डे पुन्हा नवीन अपघातांना निमंत्रण देणारेच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!