नांदेड(प्रतिनिधी)-शिरुर ता.मुखेड येथे बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी 73 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
शिवराज रमेश पांचाळ रा.दबडे शिरुर ता.मुखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 जुलैच्या सकाळी 9 ते 14 जुलैच्या मध्यरात्रीनंतर 2.30 वाजेदरम्यान त्यांचे घर पुर्णपणे बंद होते. या घराचा कुलूप आणि कडीकोंडा तोडून चोरट्यांनी त्यातून कपाटत स्टिल डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 73 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मुखेड पोलीसांनी हा चोरीचा प्रकार भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(2), 305(अ) नुसार गुन्हा क्रमांक 232/2024 प्रमाणे दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राठोड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.