नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेसाठी दि.20 जुलै 2024 ही तारीख सुनिश्चित करण्यात आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपूरी येथे ही परिक्षा सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील शिपाई आणि बॅन्डसमन पदासाठी सुरु होती. या प्रक्रियेतील शारिरीक चाचणी, मैदानी चाचणी या प्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत. या प्रक्रियेतील दोन्ही चाचणींमधून पुढे आलेल्या उमेदवारांसाठी लेखी परिक्षा 20 जुलै 2024 रोजी होणार आहे. परिक्षेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपूरी ही जागा सुनिश्चित करण्यात आली आहे. यासाठी सर्व उमेदवारांनी 20 जुलै रोजी सकाळी 8 वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे हजर राहावे असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. परिक्षा सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे.