नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षण हे ज्ञान मंदिर म्हणून ओळख जातो. या मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला विद्येचे दान या स्वरुपात मिळत असत. पण अलिकडच्या काळात मात्र आता या विद्यादानाचा बाजार मांडल्याचे चित्र दिसून येत आहे. वाडी तांड्यांवर इंग्रजी शाळांनी आपले बसस्तान मांडले असून यालाही प्रशासनाची मुक संमतीच असल्याचे चित्र स्पष्ट होते. कोट्यावधी रुपयांचा व्यवहार शैक्षणिक वर्षात होत असतांनाही याचा मात्र कोणताही हिशोब नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
राज्याच्या राज्यपाल महोदयांनी इंग्रजी शाळांच्या बाबतीत संहिता निर्माण केली. पण यालाही या इंग्रजी शाळांनी बासनात गुंडाळून ठेवून आपल्याच मनमानी पध्दतीने कारभार सुरू ठेवला आहे. शासनाच्या नियमाला बगल देत इंग्रजी माध्यमांच्या शाळा बिनधास्तपणे सुरू आहेत. मराठी भाषेचा पुळका असणारे नेते मंडळी याबाबतीत मात्र गप्प आहेत. महाराष्ट्रात मराठी ही बोली भाषा आहे. या ठिकाणचा प्रशासकीय कारभार हा मराठीतूनच केला जात असतो. राजकीय नेते मंडळींनी दुकानावरच्या पाट्या मराठीतून असल्या पाहिजे, शासकीय कार्यालयातील पाट्या मराठीतून अस्यात असे महणून मताचा पेटारा भरून घेतला. पण सर्वात मोठी शोकांतीका म्हणजे अनेक इंग्रजी शाळेत मराठी विषयच गायब आहे. याबाबत मात्र कोणीही आवाज उठवितांनाा दिसून येत नाही. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपयांची फिस इंग्रजी शाळांना द्यावी लागते. याबाबत मात्र कोणताही हिसाब या शाळांकडे नाही. अनेक पालकांनी आम्ही भरलेल्या पैशांची रितसर पावती देण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने त्या पाल्याचा प्रवेश घेण्याचेच टाळले. याबाबत शिक्षण विभागाला अनेकदा या प्रकारची माहिती दिली असतांनाही शिक्षण विभाग या बाबत आम्ही काहीही करू शकत नाही असे बिनधास्तपणे उत्तर देतात. कारण शिक्षण विभागही या इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांच्या ताटाखालचे मांजर बनले आहे. शिक्षण विभागाला त्यांच्या शिफारशीनुसार एखाद्या प्रवेश घेण्यासाठी देखील मोठा खटाटोप करावा लागतो. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा नियमबाह्य पध्दतीने सुरू आहेत. याबाबतची कोणतीही कार्यवाही होत असतांना दिसून येत नाही.
राज्यपालांच्या आदेशाला इंग्रजी शाळांनी दाखवली कैराची टोपली
इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळा ह्या 9 च्या नंतर भरविल्या पाहिजे असे परिपत्रकही राज्यपाल महोदयांनी काढल. हे परिपत्रक इंग्रजी शाळांबरोबरच मराठी, उर्दु या शाळांनाही लागू आहे. पण विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या शाळा यांचे वेळापत्रक त्यांच्या मनमानी पध्दतीने असते. अनेक शाळा प्राथमिक शाळा या 9 च्या अगोदरच भरत आहेत. याबाबत मात्र कोणीही कार्यवाही करण्यास धजत नाही. एकंदरीत या शाळांनी शिक्षणाला व्यापार करून ठेवला आहे.