राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्यांनी वाढला

नांदेड,(प्रतिनिधी)-राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पुर्णकालिक कर्मचाऱ्यांना मिळणारे महागाई भत्याच्या दरात राज्य शासनाने आज 4 टक्याने वार केली असून 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 या कलावधीतील थकबाकीसह जुलै महिन्याच्या वेतनासोबत हे हा नवीन महागाई भत्ता रोखीने देण्यात येईल.
1 जानेवारी 2024 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन रचनेतील मुळ वेतनावरील अनुज्ञय महागाई भत्याचा दर 46 टक्केवरून 50 टक्के करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार आजही महागाई भत्ता 50 टक्केच आहे. पण 50 टक्केपर्यंत आला हे सुध्दा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. जानेवारी 2024 ते जून 2024 या दरम्यानच्या वेतनात कमी मिळालेला 4 टक्के भत्ता जुलैच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा असा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे. या शासन निर्णयावर वित्त विभागाचे उपसचिव विनायक धोतरे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. हा शासन निर्णय राज्य शासनाने संकेतांक क्रमांक 202407101052289505 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *